myCAMS APP
https://bit.ly/384nT3p
Reading Time: 3 minutes

myCAMS APP 

म्युच्युअल फंड व्यवसायात रजिस्टार आणि ट्रान्सफर एजंट म्हणून ‘कॅम्स ली’ या कंपनीचे वर्चस्व असून जवळपास 70% व्यवहार त्यांच्यामार्फत होतात. त्यांचे myCAMS नावाचे ॲप प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. त्यामुळे अनेक म्युच्युअल फंड योजनांची माहिती व त्यासंबंधीचे व्यवहार आपल्याला कुठेही कधीही करता येणे शक्य आहे.

कॅम्स ली’ 16 म्युच्युअल फंड मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांचे काम करतात. त्यांच्या myCAMS ॲपद्वारे आपली सर्व गुंतवणूक आपल्याला एकाच ठिकाणी पाहता येईल व नवीन फंड हाऊसकडे योजनेचे खाते उघडता येईल. असलेल्या योजनांची खरेदी, विक्री, एका फंडाच्या एका योजनेकडून दुसऱ्या योजनेकडे जाणे सुलभ, सोपे आणि जलद होईल.

या कंपनीकडे ज्या फंड हाऊसच्या योजना आहेत त्या अशा-

  • Aditya Birla Sunlife MF
  • DSP MF
  • HDFC MF
  • HSBC MF
  • ICICI Prudential MF
  • IDFC MF
  • IIFL MF
  • Kotak MF
  • L & T MF
  • Mahindra MF
  • PPFAS
  • SBI MF
  • Sriram MF
  • Tata MF 
  • Union MF
  • Yes MF

myCAMS APP ॲप  सबस्क्रीप्शन  आणि  ॲप्स ॲप्लिकेशन

ॲप कार्यान्वित करण्याची पद्धत-

  • प्ले स्टोरवरून ॲप डाउनलोड करा. 
  • ॲपवर क्लिक केले असता चित्रात दाखवल्याप्रमाणे स्क्रीन दिसेल. यावर प्रथम रजिस्ट्रेशन करा.  
  • यासाठी वरीलपैकी कोणत्याही एका  योजनेत आपला सहभाग असल्यास खालील 
  • चित्रात दाखवल्याप्रमाणे रजिस्टरवर क्लिक करून त्या योजनेस जोडलेला मोबाईल क्रमांक व ई-मेल टाकल्यावर आपल्यास ओ टी पी येईल यानंतर आपण पासवर्ड तयार करून नोंदवू शकता.

  • जर आपण योजना सदस्य नसाल आणि प्रथमच गुंतवणूक करत असाल आणि जुन्या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर रजिस्टर अँड ट्रान्सक्ट यावर किंवा प्रथमच नव्याने विक्रीस उपलब्ध योजनेत भाग घ्यायचा असेल रजिस्टर अँड ट्रान्सक्ट इन एन एफ ओ स्कीमवर क्लिक करून येणाऱ्या सूचनांचे पालन करावे.
  • अशा प्रकारे रजीस्ट्रेशन झाल्यावर आपणास खाते तपासायचे असल्यास युजरनेम, एम पिन, पॅटर्न असे पर्याय उपलब्ध आहेत. 

  • आपल्याला जी सोय योग्य वाटते त्याची नोदणी करावी. मी माझी नोदणी MPin (एम पिन) वापरून केली आहे. मला दरवेळी लॉग इन करताना माझा मेल आय डी व एम पिन टाकावा लागतो. त्यावेळी दिसणारा स्क्रीन वरील चित्रात दाखवला आहे. 
  • लॉग इन केल्यावर सर्व फंडातील एकत्रित गुंतवणूक, त्याचा एकत्रित बाजारभाव, यात एकंदरीत झालेली वाढ किंवा घट, टक्केवारीत सरासरी गुंतवणूक परतावा व सरासरी गुंतवणूक कालावधी दिवस दिसतील, त्याखालोखाल फंड हाऊसची नावे व त्यातील गुंतवणूक टक्केवारी दिसेल. 
  • हे दिवस व त्याचा परतावा कोणत्या सूत्राने काढला त्याचे स्पष्टीकरण वाचायला मिळेल. ग्राफिक्सच्या माध्यमातून मालमत्तेच्या प्रकाराची विभागणी दिसेल.
  • एंटरवर क्लीक केले की खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे विविध पर्याय दिसतील ते वापरायला सोयीस्कर आहेत.

ॲपची वैशिष्ठे-

  • सुलभ, हाताळण्यास सोपे.
  • सुरक्षिततेची पूर्ण खात्री, दोनदा पडताळणी (Two step verification).
  • आपली कोणतीही माहिती मोबाइल सिम किंवा मेमरीमध्ये साठवली जात नाही.
  • आपल्या पॅन क्रमांकावरून एकाच ठिकाणी सर्व गुंतवणूक पाहण्याची सोय. त्याचप्रमाणे कुटुंबातील इतरांची गुंतवणूक पाहण्याची सोय.
  • प्रथम गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना अर्ज, पॅनकार्ड प्रत, चेक अशा प्रकारच्या कोणत्याही कागदांशिवाय गुंतवणूक करता येणे शक्य.
  • अधिक युनिट खरेदी, विमोचन, योजनाबदल सहज करता येणे शक्य. 
  • कोणत्याही कागदपत्राशिवाय निरंतर योजनेत कालबद्ध गुंतवणूक करता येणे शक्य.
  • एकरकमी गुंतवणूक करता येणे शक्य.
  • विमोचन करण्यास मदत होईल असे मार्गदर्शन.
  • भविष्यात व्यवहार करता येईल अशी आधीच पूर्वसूचना देता येते. 
  • विविध तरतुदींचा विचार करून आयकर विवरणपत्र भरण्यासाठी लागणारी हवी असलेली माहिती पत्रके मागवता येतात. 
  • याशिवाय काही माहिती हवी असल्यास चॅट करून मिळवता येते.

अशाप्रकारे गुंतवणूकदारांना उपयोगी पडेल असे हे ॲप असून त्यास –

  • सन 2015 पासून सलग तीनदा – Best Financial App Award at GMASA, 
  • Best use of Digital Platform for Mutual Funds at Drivers of Digital Awards 2017
  • Winner of Best Application of Technology at CX Strategy Summit and Awards 2018

या पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. 

अशाच प्रकारचे K Finkart Investor नावाचे दुसरे ॲप असून त्याच्याकडे 23 फंड हाऊसच्या फंडाचे व्यवस्थापन आहे आणि ‘कॅम ली’ खालोखाल ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यामुळे कार्वी सांभाळत असलेल्या फंडाबद्दल माहिती मिळवणे आणि व्यवहार करणे जमू शकेल, अँफीकडे नोंदणी केलेल्या 44 म्युच्युअल फंडपैकी 39 म्युच्युअल फंड योजना या दोन कंपन्यांकडे विभागलेल्या असल्याने, ही दोन अँप्स आपल्याकडे असतील तर त्यांच्या म्युच्युअल फंडासंबंधीत बहुतांश गरजा पूर्ण होतील.

– उदय पिंगळे

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: myCAMS APP in Marathi, myCAMS APP Marathi Mahiti, myCAMS APP Marathi

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…