तत्पुर्वी-
११. डीएसए, ब्रोकर किंवा ऑनलाईन मार्केटप्लेसेस जास्त चार्जेस लावतात :
प्रतिष्ठित ब्रोकर, डीएसए, कन्सल्टंट, एजंट किंवा ऑनलाईन मार्केटप्लेस ह्यांपैकी कोणीही होम लोन घेणार्यांना कुठलेही चार्जेस लावत नाहीत. ते होम लोन देणार्यांकडून चार्जेस घेतात.
१२. फी अथवा इतर चार्जेस यांच्याबाबतीत बँका कुठल्याही वाटाघाटी करत नाहीत :
साधारणत: होम लोन देणार्या बँका किंवा संस्था व्यवहार उत्तम होण्यासाठी व्याजदरात वाटाघाटी करण्याकडे लक्ष देतात. प्रक्रिया शुल्क, स्टॅम्प ड्यूटी, फ्रॅन्किंग फी, फाईल चार्ज आणि सर्व्हिस चार्ज अशा अनेक चार्जेसच्या बाबतीत तुम्ही बँकेशी वाटाघाटी करू शकता.
१३. प्रीपेमेंट किंवा फोरक्लोजर फीजवर बँका किंवा एनबीएफसी दंड आकारतात :
जर तुम्ही भारतात राहत असाल, तर तुम्ही तुमच्या होम लोनवरची प्रीपेमेंट पेनल्टी किंवा फोरक्लोजर चार्ज यांची काळजी करायला हवी. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कोणतीही बँक किंवा एनबीएफसी होम लोनवर फोरक्लोजर फी किंवा प्रीपेमेंट पेनल्टी घेऊ शकत नाही.
१४. चांगला सिबिल स्कोअर होम लोनच्या मंजुरीची हमी देतो :
चांगला सिबिल स्कोअर होम लोन मंजूर होण्यासाठी पुरेसा आहे हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. सिबिल हा त्यासाठी एक निकष आहे. जर तुमचं नाव डीफॉल्तर्स लिस्टमध्ये असेल, किंवा तुमच्या सहअर्जदाराचा सिबिल स्कोअर तितकासा चांगला नसेल, किंवा समाधानकारक परतावा करण्याचा तुमचा इतिहास नसेल, तर तुमचा सिबिल स्कोअर चांगला असूनही तुम्हाला होम लोन देणे बँक नाकारू शकते.
१५. कमी क्रेडिट स्कोअर म्हणजे होम लोन नाही :
क्रेडिट स्कोअर चांगला असणं ही एक चांगली गोष्ट आहे; पण म्हणून कमी क्रेडिट स्कोअर असण्याने तुम्हाला होम लोन मिळायची शक्यता कमी झाली असंही नाही. पारंपरिक बँका तुम्हाला होम लोन नाकारू शकतात; पण एनबीएफसी किंवा होम लोन देणार्या पर्यायी संस्थांकडून थोड्याशा वाढीव व्याजदराने लोन मिळू शकते.
(चित्र सौजन्य- https://goo.gl/LpgLey )