भारतामध्ये युपीआय आणि ऑनलाईन व्यवहार वाढल्यामुळे ऑनलाईन स्कॅम मध्ये वाढ होत चालली आहे. फसवणूक झाल्याची अनेक प्रकरणे रोजच उघडकीस येत असतात.
काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीच्या अकाऊंटमधून ५६००० रुपयांची ऑनलाईन घोटाळ्यात फसवणूक झाली होती. ती व्यक्ती एका टूरवर गेली होती, त्यावेळी त्याने वेबसाईटवर एका टूर ऑपरेटरचा नंबर पहिला आणि त्याला कॉल करून चौकशी केली. सगळे काही व्यवस्थित वाटत होते. त्या व्यक्तीने युपीआयने पैसे पाठवले तर त्याच्या खात्यातील ५६००० रुपये दुसऱ्या अकाउंटवर पाठवण्यात आले.
पैसे पाठवल्यानंतर संबंधित व्यक्तीला आपली चूक झाल्याची जाणीव झाली. दरवेळी कोणत्याही माध्यमातून ऑनलाईन व्यवहार न करणाऱ्या व्यक्तीला फसवणुकीचा बळी व्हावे लागले.
हेही वाचा – बँक सेविंग अकाउंट मध्ये तुम्ही खूप पैसे साठवता का? मग ‘हे’ नक्की वाचा !
कोणालाही पैसे पाठवण्यापूर्वी खालील १० गोष्टींची काळजी घायला हवी.
१. पैसे पाठवण्यापूर्वी कंपनीचे नाव आणि नंबर गुगल वर सर्च करा –
- फोन नंबर किंवा ईमेल गुगल वर जाऊन सर्च केला तर संबंधित व्यक्तीबद्दलची भरपूर माहिती त्यावर दिसून येते.
- त्या व्यक्तीने दुसऱ्यांची फसवणूक केली असेल तर त्यासंदर्भातील माहिती गुगल वर मिळण्याची शक्यता असते.
- समजा तुम्ही एखादा कॉन्टॅक्ट नंबर ऑनलाईन सर्च केला आणि तो नंबर अनेक वेगवेगळ्या नावाने संशयास्पद व्यवसायांसाठी वापरला जात असल्याचे दिसून येत असेल तर तुमची फसवणूक होत असल्याचे समजून जावे.
२. युपीआय द्वारे पैसे पाठवण्यापेक्षा NEFT/IMPS पद्धतीद्वारे पाठवा –
- युपीआय हे पैसे पाठवण्याचे सर्वात जलद आणि सुरक्षित माध्यम आहे. युपीआय द्वारे समोरील माणसाची पूर्णपणे ओळख पटत नाही. त्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता असते.
- युपीआय द्वारे पैसे पाठवताना तुम्हाला शंका वाटत असेल तर NEFT/IMPS पद्धतीद्वारे आपण व्यवहार करू शकता.
- या पद्धतीने पैसे पाठवल्यानंतर समोरच्याचे नाव, त्याचे बँक अकाउंट आणि शाखेबद्दलची माहिती मिळत असते.
- त्यामुळे जर फसवणूक झालीच तर तपास करायला आणि तक्रार दाखल करायला सोपे जाते.
३. घाई करू नका –
- घाई करू नका म्हणजे काय? हा प्रश्न तुमच्या मनात नक्की पडला असेल.
- मोठी रक्कम पाठवताना कधीही घाई करू नका. एखाद्या वेळी घाईघाईत काम केल्यामुळे मोठा आर्थिक भुर्दंड तुम्हाला पडू शकतो.
- त्यावेळी चुकीच्या होत असलेल्या गोष्टींकडे लक्ष जात नाही.
- ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहेत त्याच्याशी आधी बोलावे, ₹100 किंवा ₹200 अशी काही रक्कम आगाऊ पाठवा त्यानंतर व्यवस्थित माहिती घेऊनच पैसे पाठवावे.
हेही वाचा – पेटीएम फसवणूक
४. नेहमी काही पैसे आगाऊ द्या, संपूर्ण माहिती देऊ नका –
- एखादी वस्तू चांगली दिसली की संपूर्ण शहनिशा न करता आधीच लोक तिचे पूर्ण पैसे देऊन टाकतात. त्यांना वस्तू घेतल्यानंतर पैसे देण्याचा ताण ठेवायचा नसतो.
- कोणावरही डोळे झाकून पूर्णपणे विश्वास ठेवू नये. वस्तूची खरेदी करण्याच्या आधी काही आगाऊ पैसे भरावेत, संपूर्ण पैसे कधीही देऊन टाकू नये.
५. सतत कॉल येत राहणे धोक्याचे ठरू शकते –
- अनेक घोटाळेखोर विक्रेते ग्राहकांना सारखे कॉल आणि मेसेज पाठवून त्रास देत असतात. समजा एखाद्या व्यक्तीने कॉल केला आणि आपण त्यात रस दाखवला तर ती व्यक्ती सतत मेसेज आणि कॉल करून त्रास देत असते.
- हा एक धोक्याचा संदेश असू शकतो. एखाद्या वेळेला आपल्याला असा अनुभव आला तरी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.
६. फसवणुकीचा कॉल आलेल्या क्रमांकाची माहिती काढा –
- अनेक उद्योजक असे आहेत ज्यांची ऑनलाईन माध्यमावर हजेरी असते. त्यांच्याकडे, फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेज आणि इतर सोशल माध्यमावर त्यांची हजेरी असते.
- आपण दुसऱ्यांची मते वाचून, फोन क्रमांक, पत्ता आणि इतर माहितीची तपासणी करू शकता.
हेही वाचा – फसवणुकीपासून स्वतःला कसे वाचवाल? लक्षात ठेवा हे तीन सुवर्ण नियम
तुमचे मेहनतीने मिळवलेले कष्टसाध्य पैसे दुर्लक्ष करून गमावू नका. ऑनलाईन खरेदी करताना नेहेमी काळजी घ्या!