Pay As You Drive Insurance
https://bit.ly/3b1AQLv
Reading Time: 3 minutes

आता गाडीच्या वापरानुसार वाहनविमा

गाडीच्या वापरानुसार वाहनविमा (Pay As You Drive Insurance)  ही संकल्पना सध्या प्रायोगिक तत्वावर वाहनधारकांसाठी उपलब्ध करण्यात आलेली आहे.  ही योजना फक्त वैयक्तीक मोटार वाहनधारकांना उपलब्ध आहे. 

वाहनविमा घेणे मोटार वाहन अधिनियम कायद्याने आवश्यक असून तो सर्वसमावेशक (Comprehensive) किंवा तृतीय पक्षी (Third Party) अशा प्रकारे घेता येतो हे आपल्याला माहिती आहेच. यातील तृतीय पक्षी विम्याचा हप्ता कमी असून, त्यामुळे फक्त गाडीने केलेल्या अन्य गाडीच्या नुकसानीची किंवा अपघाताची भरपाई होईल. जर गाडीचे गाडीच्या मालकाचेही नुकसान भरून हवे असेल तर सर्वसमावेशक विमा घ्यावा लागेल. त्याचा हप्ता तुलनेने बराच जास्त असतो. याशिवाय शून्य घसारा (Without Depreciation) आकारणी करणाऱ्या वेगळ्या योजना आहेत. या सर्वच योजनांचे हप्ते गाडीच्या इंजिनाच्या शक्तीनुसार वाढत जातात. 

हे नक्की वाचा: बनावट वाहनविम्यापासून सावध रहा

 • आर्थिक विषयाशी संबंधित सर्वच जण कोणत्या तरी नियामकाच्या (Regulator) अधिपत्याखाली आहेत जसे 
  • बँका/ बिगर बँकिंग संस्था/ परकीय चलन/ गृह कर्ज देणाऱ्या संस्था या रिजर्व बँकेच्या  (RBI)
  • शेअर/ म्युच्युअल फंड/ रोखे/ कमोडिटी व्यवहार सेबीच्या नियंत्रणात (SEBI)
  • जीवन विमा/ सर्वसाधारण विमा इरडाच्या (IRDAI
  • सर्व प्रकारच्या पेन्शन योजना पीएफआरडीएच्या (PFRDA)  नियंत्रणाखाली आहेत. 
 • या संबधित संस्था विविध प्रकारच्या योजना बाजारात आणतात या योजनांना नियामकांची मंजुरी मिळवावी लागते. 
 • नियामकाशी संबधित संस्थेने तंत्रज्ञानाचा, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून त्यांच्या ग्राहकांना अधिक कल्पक योजना अल्पखर्चात द्याव्यात. 
 • त्या देताना फक्त कागदोपत्री उपयुक्त नसून त्याची उपयुक्तता व्यवहारात सिद्ध व्हावी या हेतूने काही योजना नियमांच्या चौकटीधीन राहून प्रायोगिक तत्वावर परवानगी देते. 
 • त्याची उपयुक्तता सिद्ध झाल्यावर सर्वांसाठी आणल्या जातात. 
 • यामुळे ग्राहकांना त्याचा फायदा होऊन उद्योजक, बाजार आणि पर्यायाने अर्थव्यवस्थेस बळकटी मिळेल. 
 • एखादे नवीन औषध बाजारात आणण्यापूर्वी त्याच्या क्लिनिकल ट्रायल घेऊन ज्याप्रमाणे त्याची उपयुक्तता तपासली जाते, तसाच हा प्रकार असून या पद्धतीस नियामक ‘सॅन्डबॉक्स’ (Regulatory Sandbox किंवा RS) असे म्हणतात. 
 • भारतातील सर्व नियमकांची ही सुविधा संबंधितांना उपलब्ध करून दिली आहे. 
 • यात गुंतवणूकदारांची सुरक्षितता आणि जोखीम संरक्षण याला प्राधान्य दिले जाते. त्यामुळेच सध्या प्रस्तावित असलेल्या अनेक योजना संबंधित नियामकानी नामंजूर (78%) केल्या असून अन्य काही मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. 

  Pay As You Drive Insurance:  गाडीच्या वापरानुसार वाहनविमा

 • ‘गाडीच्या वापरानुसार वाहनविमा’ ही अशाच प्रकारे मंजूर करण्यात आलेली ‘सॅन्डबॉक्स’ योजना असून ही योजना फक्त वैयक्तीक मोटार वाहनधारकांना उपलब्ध आहे. 
 • हा सर्वसमावेशक विमा असून तो वाहनाच्या वापरानुसार आकारला जाईल. 
 • सध्या प्रायोगिक तत्वावर ही योजना एक वर्षांपूरती मर्यादित आहे.
 • अनेक कंपन्यांनी एप्रिल 2020 पासून अशा योजना बाजारात आणल्या असून येत्या वर्षभर त्या उपलब्ध आहेत. 
 • अशा प्रकारच्या आपल्या योजना आणून पहिल्या 6 महिन्यात 10,000 ग्राहक आणण्याच्या अटींवर IRDAI ने 21 सर्वसाधारण विमा कंपन्यांना परवानगी दिली आहे.

संबंधित लेख : General Insurance -सर्वसाधारण विमा योजनेचे विविध प्रकार

गाडीच्या वापरानुसार वाहनविमा या योजनेची वैशिष्ठे (Pay As You Drive Insurance -Features)

 • आयआरडीएआयची मान्यता असलेली येत्या वर्षभर उपलब्ध असणारी प्रायोगिक तत्त्वावरील कल्पक सॅन्डबॉक्स योजना.
 • वाहन विमा कालावधी 1 वर्ष.
 • नियमित सर्वसमावेशक योजनेच्या तुलनेत वार्षिक हप्ता अत्यंत कमी.
 • यात समाविष्ट तृतीय पक्षी कवचाचा हप्ता नियमकाकडून निश्चित तर इतर सर्वसमावेशक समाविष्ट गोष्टीसाठीचा हप्ता योजनेची प्रवर्तक कंपनी ठरवणार.
 • हा प्रीमियम वाहनाच्या वार्षिक वापराशी निगडित प्रत्येक टप्यावर बदलता.

महत्वाचे मुद्दे 

 • नियमित सर्वसमावेशक वाहन विम्याच्या तुलनेत ही वेगळी पॉलिसी असल्याने कंपनीने ठरवलेले वाहन वापराचे टप्पे विचारात घ्यावे लागतील. 
 • तुमची विमा कंपनी कोणतीही आकारणी न करता एक इलेक्ट्रॉनिक साधन वाहनात बसवून देईल जे वाहनाचा वापर आणि वापरण्याची पद्धत याची नोंद ठेवेल. 
 • आपल्या गरजेनुसार सुयोग्य किलोमीटरचा टप्पा निवडून अधिक सोई घेता येतील. 
 • पॉलिसीत असलेल्या करारानुसार किलोमीटर संपल्यास अधिकचे किलोमीटर (Top Up) खरेदी करता येतील. 
 • असे किलोमीटर खरेदी न केल्यास फक्त तृतीयपक्ष करार लागू असेल. 
 • काही काटछाट करून या पॉलिसीचे अन्य पॉलिसीत रूपांतर करायचे असल्यास ते करारातील अटी शर्तीनुसारच होईल. यामुळे कमी प्रीमियम मध्ये आपल्याला मनासारखा सर्वसामावेशयुक्त वाहनविमा मिळवणे यामुळे शक्य होत आहे. 

हे नक्की वाचा कार लोन रिपेमेंट केल्यावर या गोष्टी विसरू नका !

Pay As You Drive Insurance: कोणासाठी उपयोगी-

 • असे वाहनधारक ज्यांचा वार्षिक वाहन वापर कमी आहे.
 • असे वाहनधारक ज्यांच्याकडे एकाहून अधिक वाहने असल्याने काही वाहने किंवा सर्वच वाहने मर्यादीत प्रमाणात वापरली जातात.
 • असे वाहन धारक जे नियमित वापरासाठी सार्वजनिक वाहतूक साधने वापरतात आणि काही विशिष्ट प्रसंगी आपले वाहन वापरतात. 
 • अशा व्यक्ती ज्या मोठ्या प्रमाणात कार्यव्यस्त असतात, त्यांना त्यांचे वाहन वापरण्यास वेळच नसतो. 

अशा प्रकारच्या योजनांची परवानगी  सर्वसाधारण विमा कंपन्यांनी इन्शुरन्स नियामकाकडून मिळवली असून त्यातील काहींनी अशा प्रकारच्या योजना बाजारात आणल्यामुळे या कंपन्यांत व्यावसायिक स्पर्धा निर्माण झाल्याने आपल्या जरुरीप्रमाणे योग्य सर्वसामावेशक योजना निवडण्याचा अधिकचा पर्याय ग्राहकांना उपलब्ध झाला आहे. 

– उदय पिंगळे

For suggestions queries – Contact us: [email protected] 

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: Pay As You Drive Insurance Marathi Mahiti, Motor Insurance Marathi Mahiti, Car insurance Marathi Mahiti, Pay As You Drive Insurance in Marathi

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.