बनावट वाहनविमा
Reading Time: 2 minutes

बनावट वाहनविमा योजना 

बनावट वाहनविमा तसेच इतर विमा योजना विकून ग्राहकांची फसवणूक करण्याचे प्रकार विमा उद्योगक्षेत्रात अनेक वर्षांपासून घडत आहेत. विमा व्यवहारातील प्रक्रियेतील गुंतागुंत, बाह्य यंत्रणावर (थर्ड पार्टी सर्व्हिस प्रोव्हायडर्स) असणारे मोठे अवलंबित्व यामुळे  विमा कंपन्यांना या धोक्यांचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर ग्राहकांमध्ये विमा योफसजनांबद्दल असलेले अज्ञान आणि विमा ही फायदा नसलेली गुंतवणूक (डेड इन्व्हेस्टमेंट) असल्याचा गैरसमज यामुळे अनेक ग्राहक बनावट योजनांच्या जाळ्यात सापडतात.

नुकत्याच लागू झालेल्या नियमांनुसार, प्रत्येक दुचाकीधारकाला त्यांच्या वैयक्तिक वाहन विम्यासोबत पाच वर्षांसाठी थर्ड पार्टी विमा तर खासगी कारमालकांना तीन वर्षांसाठी थर्ड पार्टी विमा उतरवणे बंधनकारक आहे. त्यामुळे वाहन विम्यासाठीच्या हप्त्यांमध्ये ग्राहकांच्या दृष्टीने लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळेच अधिकृत विमा योजनांपेक्षा खूप स्वस्त दरामध्ये बनावट विमा योजना विकून बेसावध ग्राहकांची फसवणूक करण्यासाठी गुन्हेगारांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे

अशाप्रकारे ग्राहकांची फसवणूक करण्याचे प्रकार देशभर दिसून येतात. अनेक ठिकाणी अशा गुन्हेगारांविरोधात पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे देखील नोंदवण्यात आले आहेत. पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू, दिल्ली, उत्तर प्रदेश, केरळ, गुजरात अशा अनेक राज्यांमध्ये ग्राहकांची अशा प्रकारे फसवणूक झाल्याचे आढळले आहे.

फसवणूक कशी टाळाल?

  • भारतात थर्ड पार्टी वाहन विमा उतरवणे कायद्याने बंधनकारक असल्यानेच ग्राहकांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या सर्वसाधारण विमा योजनांमध्ये या योजनेचे प्रमाण सर्वाधिक आहे
  • ग्राहकांना योजनेचे तपशील पूर्णपणे माहिती नसल्याने, कागदोपत्री व्यवहारांमुळे तसेच ग्राहक त्याकडे बंधनकारक बाब म्हणूनच पाहत असल्याने, गुन्हेगारांचे काम सोपे होते
  • हे गुन्हेगार विमा कंपन्यांनी पूर्वी जारी केलेल्या अधिकृत योजनांच्या प्रतींचा वापर करून नव्या ग्राहकांच्या नावे पूर्णपणे बनावट योजनेची कागदपत्रे बनवतात. हीच बनावट विमा योजनेची कागदपत्रे ग्राहकांबरोबरच प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) दिली जातात. ही कृती केवळ बेकायदेशीरच नाही तर एखादा अपघात झाल्यास ग्राहकांना प्रचंड आर्थिक अडचणीत आणणारी ठरते. या अपघातात जर अन्य व्यक्तींच्या (थर्ड पार्टी) जीवाला अथवा मालमत्तेला काही धोका पोहोचल्यास काही कोटी रुपयांची नुकसानभरपाईदेखील द्यावी लागू शकते

ग्राहकांनी विमा योजना खरेदी करतेवेळी योग्य खबरदारी घेतली तर हे सारे नुकसान फसवणूक टळू शकते. त्यासाठी खाली दिलेल्या सहा पायऱ्या महत्त्वाच्या आहेत:

  1. ग्राहकांनी थेट विमा कंपनीशी संपर्क साधून विमा योजनेची पूर्ण माहिती घ्यावी. विमा कंपनीला मेल करून किंवा त्यांच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधून किंवा कंपनीच्या वेबसाइटवरून ही माहिती मिळवता येईल.
  2. प्रत्येक हप्ता भरल्यानंतर योग्य, अधिकृत पावती आवर्जून मागून घ्यावी.
  3. अलिकडे प्रत्येक विमा योजनेच्या प्रतीवर क्यूआर कोड असतो. त्याद्वारे विमा योजनेची सत्यता पडताळता येईल. स्मार्टफोनवरील क्यू आर कोड रीडर प्लिकेशनच्या मदतीने ही पडताळणी करता येईल.
  4. प्रत्येकाने विमा योजना समजून घेण्यासाठी वेळ काढला पाहिजे. विमा प्रमाणपत्राबरोबरच विमा योजनेच्या कवचाअंतर्गत समाविष्ट असलेल्या बाबी नीट समजावून घेतल्या पाहिजेत.
  5. थेट विमा कंपनीकडून किंवा त्यांनी मान्यता दिलेल्या प्रतिनिधींच्या माध्यमातूनच विमा योजनेची खरेदी केल्यास बनावट विमा योजनेपासून आपोआपच बचाव होईल
  6. ग्राहकांनी विमा योजनेचा हप्ता ऑनलाइन अथवा चेक किंवा क्रेडिट कार्डाच्या माध्यमातूनच भरावा, जेणेकरून ही रक्कम विमा कंपनीच्याच खात्यात जमा होईल.

भविष्यात एखादा अपघात किंवा दुर्घटना झाल्यास ओढवणाऱ्या संकटाच्या तुलनेत विम्याचा हप्त्याची रक्कम अतिशय कमी असते. त्यामुळे दूरदर्शी ग्राहकांनी आपण अधिकृत विमा योजनाच खरेदी करत आहोत ना, याची पडताळणी नक्कीच करावी

विमा योजनेअंतर्गत ग्राहकांवरील आर्थिक जोखीम ही विमा कंपनी स्वीकारते, अर्थातच जर ती कोणा गुन्हेगाराच्या किंवा फसव्या व्यक्तीच्या माध्यमातून नव्हे तर अधिकृतरित्या खरेदी केलेली असेल तरच. अशाप्रकारच्या फसवणुकीचे वाढते प्रकार लक्षात घेता, तुमच्या वाहन विम्याची वैधता सुनिश्चित करण्यासाठी योग्य दक्षता घेणे आवश्यक आहे. तेव्हा अधिकृत विमा योजना खरेदी करा, सावध रहा, सुरक्षित रहा.

– संजीव द्विवेदी,

हेडइन्व्हेस्टिगेशन अँड लॉस मिटिगेशन टीम
बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स.

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मोबाईल चोरीला गेलाय? बँकेबाबत ऑनलाईन माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी करा ‘या’ गोष्टींचे पालन

Reading Time: 3 minutes गर्दीत असताना फोन चोरीला जाण्याची दाट शक्यता असते. फोन चोरीला गेल्यानंतर वैयक्तिक…

ऑनलाईन व्यवहार करताना भीती वाटते? या टीप्स नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes मागच्या दोन वर्षात म्हणजे कोविड दरम्यान झपाट्याने काही बदललं असेल तर ते…

Ponzi Schemes: फसव्या योजना कशा ओळखाल?

Reading Time: 2 minutes गुंतवणूक तर सगळेच करतात. ज्या गुंतवणुकीमध्ये आकर्षक परतावा असेल, त्या गुंतवणुकीला लोकं प्राधान्य देतात. साहजिकच आहे, पैसा कोणाला नको असतो? पण, हे साध्य करायचा मार्ग कोणता आणि कसा आहे, याची माहिती असल्याशिवाय फक्त आकर्षित व्याजदरांमागे धावू नये. लक्षात ठेवा चकाकतं ते सोनं नसतं. आकर्षक परताव्याच्या चकचकीत ऑफर्स फसव्या असू शकतात.