Reading Time: 2 minutes

मोबाईलने माणसाच्या आयुष्यात खूप मोठी क्रांती घडवली. सुरुवातीला संपर्काचं फक्त एक साधन म्हणून मोबाईलकडे बघितलं जायचं. पण स्मार्टफोनच्या आगमनानंतर मात्र सारे संदर्भच बदलले. अगदी तिकीट बुकिंग पासून बँकेच्या व्यवहारापर्यंत सगळ्याच गोष्टी माणसाच्या हातात आल्या.

 • “Salary Credited to Your Account No. xxxxxx .” हा मेसेज सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यातला एक महत्वाचा आणि आनंद देणारा मेसेज आहे. असाच एक मेसेज सध्या व्हाट्स ऍपवर फिरतो आहे, तो म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेन्टकडून येणारा ‘रिटर्न अमाऊंट क्रेडीटेडचा मेसेज’!
 • दुर्दैवाने ‘सॅलरी क्रेडीटेड’च्या मेसेजप्रमाणे हा मेसेज आनंद देणारा नाही.  इन्कम टॅक्स डिपार्टकडून अशा प्रकारचे कोणतेही मेसेज नागरिकांना पाठविण्यात आलेले  नसून अशा प्रकारच्या मेसेजेसच्या बाबतीत नागरिकांनी सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे.
 • भारतातील सर्वात मोठ्या सायबर सिक्युरिटी एजन्सीमार्फत (CERT) इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मंत्रालयाच्या अंतर्गत यासंदर्भात सावधगिरी बाळगण्याची सूचना देण्यात आली आहे.
  null

वरील इमेजेसमध्ये या CERT मार्फत प्रसारित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये आलेले मेसेजेस इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने पाठविलेले नसून ते ‘फेक मेसेजेस’ आहेत. सायबर क्रिमिनल्स सर्वसामान्यांना फसविण्याचे नवनवीन मार्ग शोधत असतात. अशा प्रकारचे मेसेजदेखील त्यातलाच एक प्रकार आहे.

 • अकाउंट व्हेरिफाय करण्यासाठी अथवा मेसेजमध्ये नमूद केलेला अकाउंट नंबर (खाते क्रमांक) चुकीचा असल्यास (हा साहजिकच चुकीचा असणार) दिलेल्या पर्यायाला म्हणजेच मेसेजमध्ये नमूद केलेल्या लिंकवर क्लिक केले जाते.
 • मेसेजमध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक केले असता ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ची वेबसाईट ओपन होते. ही वेबसाईट बँकेची अधिकृत वेबसाईट असल्यासारखी वाटत असली तरीही ती बँकेची अधिकृत वेबसाईट नाही.
 • परंतु वेबसाईट बघितल्यावर एक क्षण असे वाटते की ही बँकेची अधिकृत वेबसाईट आहे. अधिकृत वेबसाईट्सना असते त्याप्रमाणे ‘लॉक’चे चिन्हही या वेबसाईटवर दिसते. त्यामुळे ही सुरक्षित वेबसाईट आहे असे समजून अनेकांची दिशाभूल होते. या वेबसाईटवर आपल्या डेबिट कार्डची संपूर्ण माहिती (CVV नंबर सकट) व जन्मतारीख भरल्यास तुमच्या बँक अकाऊंटची किल्ली सायबर क्रिमिनल्सच्या हातात जाते.
 • कधी अकाउंट  रजिस्टर नसल्याचं सांगणारा  मेसेज येतो व त्याद्वारे अशाच एखाद्या अधिकृत वाटणाऱ्या परंतु प्रत्यक्षात फेक असणाऱ्या एखाद्या  लिंकवर क्लिक करायला सांगितले जाते.
 • तर कधी दिलेल्या लिंकवर क्लिक केले असता चक्क ‘इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची’ फेक वेबसाईट ओपन होते.

 • वरील इमेज ही CERT मार्फत प्रसारित करण्यात आलेली इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या ‘फेक वेबसाईटची’ इमेज आहे. प्रथमदर्शनी पाहिल्यावर अगदी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची वेबसाईट वाटत असली तरी प्रत्यक्षात मात्र हे सायबर क्रिमिनल्सनी विणलेलं एक जाळं आहे.
 • ही बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचणे आवश्यक आहे. अशा प्रकारच्या ‘फेक मेसेजेस”बद्दल माहिती देऊन जागृती करणारे मेसेजेस  सोशल मीडियावर वेळोवेळी फिरत असतात, परंतु ते पुरेसं नाही. कारण सायबर क्रिमिनल्सचं जाळं हे खूप मोठं आहे. त्यामुळे सावधगिरी बाळगणे हे केव्हाही शहाणपणाचं आहे.

फक्त  इन्कम टॅक्स रिफंड संदर्भात येणाऱ्या मेसेजेसबाबत नाही तर अशाप्रकारच्या कुठल्याही मेसेजेसमध्ये येणाऱ्या लिंक्सवर त्या मेसेजसंदर्भात खात्री  असल्याशिवाय शक्यतो क्लिक करू नका. कुठल्याही गोष्टीची खातरजमा झाल्याशिवाय आपले बँक अकाउंट किंवा डेबिट कार्ड डिटेल्स कोणालाही देऊ नका.

तुमची क्षणाची गाफीलता तुम्हाला खूप महागात पडेल आणि “Your account is debited to Rs . xxxxx. Your account balance is Rs. 0.00”,  असा मेसेज पुढच्या क्षणाला तुम्हाला येईल आणि दुर्दैवाने हा मेसेज बँकेकडून आलेला अधिकृत मेसेज असेल.

 

(चित्रसौजन्य: https://bit.ly/2SpHMaV )

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मोबाईल चोरीला गेलाय? बँकेबाबत ऑनलाईन माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी करा ‘या’ गोष्टींचे पालन

Reading Time: 3 minutes गर्दीत असताना फोन चोरीला जाण्याची दाट शक्यता असते. फोन चोरीला गेल्यानंतर वैयक्तिक…

सायबर सुरक्षेसाठी काही महत्वाच्या टिप्स

Reading Time: 5 minutes तंत्रज्ञानाचा प्रसार आणि प्रचार, सर्वात स्वस्त डेटा प्लॅन, यामुळे इंटरनेटचा वापर वाढला असून सन २०२१ पर्यंत भारतातील ७३ कोटी लोक इंटरनेट वापरत असतील असा अंदाज आहे. सध्या ऑनलाइन व्यवहारातील ७०% व्यवहार मोबाईलवरून केले जात आहेत. फेसबुक, गुगल, व्हॉटसप, इन्स्टाग्राम, ट्विटर, यु ट्यूब यासारख्या गोष्टींचा वापर करणारी प्रत्येक व्यक्ती, या माध्यमातून आपली खरी/खोटी प्रतिमा निर्माण करीत असते. त्याने केलेली कोणतीही कृती म्हणजे “डेटा”असं आपण म्हणू शकतो. 

Cyber Security – इंटरनेट वापरताना कुठे क्लीक करताय ?

Reading Time: 2 minutes इंटरनेटच्या जगात आपण रोज अनेक वेग वेगळ्या वेबसाइट बघत असतो, कळत नकळत आपण अनेक ठिकाणी क्लीक करतो,  “Download” असं मोठ्या हिरव्या अक्षरात लिहिलेल्या अनेक पाट्या वेबसाईटवर दिसू लागतात, त्यापैकी एकावर आपण क्लीक करतो आणि जाळ्यात अडकतो … तेही एका चुकीच्या क्लीकमुळे. हा हल्ला करणाऱ्याकडून BeEF (बीफ) हे टूल वापरलं जातं. 

अपघाती मृत्यूला दहापट नुकसानभरपाई? काय आहे या मेसेजमागचे सत्य?

Reading Time: 3 minutes अपघाती मृत्यूला दहापट नुकसानभरपाई? सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या गोष्टींचा वेग प्रकाशाच्या वेगापेक्षाही…