Reading Time: 3 minutes

गर्दीत असताना फोन चोरीला जाण्याची दाट शक्यता असते. फोन चोरीला गेल्यानंतर वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी काळजी घेणे आवश्यक असते. अशावेळी खालील गोष्टींची काळजी घेतली तर आपली माहिती आणि बँकिंग संदर्भातील तपशील सुरक्षित राहू शकतो. 

फोन चोरीला गेल्यानंतर काय करावे? 

१. सर्वात प्रथम चोरीला गेलेल्या मोबाईल वर कॉल करावा – 

  • फोन चोरीला गेल्यानंतर सर्वात प्रथम दुसऱ्या फोनवरून कॉल करून पाहावे. अशा वेळी समजा फोन दुसऱ्याजवळ चुकून गेला असेल किंवा एखाद्या ठिकाणी विसरून आलेले असाल तर कॉल करून त्याचे ठिकाण आपण जाणून घेऊ शकता. 
  • तुमचा फोन सायलेंट केलेला नसेल तर तो तुम्हाला लगेच मिळूही शकतो. 
  • तुमच्या खिशातून फोन पडला असेल तर आवाज ऐकून एखादा व्यक्ती तुमचा फोन उचलू शकतो आणि तुम्हाला तो मिळू शकतो. 

२. फोन वापरत असताना लॉक ठेवा  – 

  • अँड्रॉइड किंवा आयओएसचा वापर करत असताना त्याला पॅटर्न, फेस लॉक किंवा पासवर्ड ठेवा. 
  • समजा अँड्रॉइड फोन हरवला तर अँड्रॉइड डिव्हाईस मॅनेजरचा वापर करू शकता. गुगल आयडीच्या मदतीने फोनचे ठिकाण सहज मिळू शकते. 
  • आयओएस फोन असेल तर Find my iphone पर्यायावर क्लिक करून मोबाईल शोधून काढावा. 

३. बँकेला माहिती द्या  – 

  • नेटबँकिंग सुविधा तात्पुरती बंद करा किंवा नेटबँकिंगचा पासवर्ड बदला. 
  • क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड द्वारे होणारे व्यवहार बँकेला कळवून तात्पुरते थांबवा. 
  • मोबाईल मध्ये डेबिट, क्रेडिट कार्ड ठेवण्याची काही लोकांना सवय असते. फोन हरवला तर कार्डही त्यासोबतच हरवते. अशावेळी ओटीपी आल्यास मोबाईल चोरणाऱ्याला पैसे काढता येतात. 

४. जीपीएसच्या मदतीने हरवलेला फोन शोधा – 

  • कॉल करून फोन मिळत नसेल तर जीपीएसच्या मदतीने शोधण्याचा प्रयत्न करा. फोनचे जीपीएस चालू नसेल तर या पद्धतीचा उपयोग होत नाही. 
  • अँड्रॉइड फोनमध्ये इनबिल्ट ट्रॅकिंग सेवा दिली जाते. तिच्या मदतीने फोन शोधायला मदत होते. 
  • उदा – दुसऱ्या मोबाईल वरून गुगल अकाउंट लॉग इन करून गुगलच्या हिस्ट्री मध्ये फोनचे स्थान ट्रॅक केले जाते. 

५. फोन हरवल्यानंतर सर्व डेटा डिलीट करून टाका – 

  • मोबाईल चोरणाऱ्याने बॅटरी आणि सिम काढून घेतल्यावर कॉल किंवा जीपीएसचा वापर करून पण फोन मिळत नाही. 
  • तुम्ही तुमच्या गुगल आणि आय क्लाउड वरील सर्व डेटा डिलीट करू शकता पण त्यामुळे परत मोबाईल मिळण्याची शक्यता कमी होते. 
  • पण जर फोनचा डेटा बॅकअप आधीच घेऊन ठेवला असेल तर तो सहज रिस्टोर करता येऊ शकतो. 

नक्की वाचा : सिम फ्रॉड कॉल 

६. फोन चोरीला गेला किंवा हरवला तर पोलीस तक्रार करा – 

  • फोन न हरवता चोरीला गेला आहे असे तुमच्या लक्षात आले तर सर्वप्रथम पोलीस तक्रार दाखल करा. 
  • फोन खरेदी करताना विमा काढलेला असेल तर चोरीला गेल्यानंतर विमा कंपनीला याबाबत माहिती द्या . 
  • पोलीस स्टेशनमध्ये प्रत्यक्ष न जाताही ऑनलाईन माध्यमातून मोबाईल हरवल्याची तक्रार दाखल करता येते. 

७. सिमकार्ड बंद करा – 

  • फोन चोरीला गेल्यानंतर उत्तर मिळत नसेल तर सिम कार्डच्या सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन ते बंद करा. 
  • त्यामुळे फोन जरी परत मिळणार नसला तरी त्यातील सिमकार्डचा चुकीचा वापर होऊ शकत नाही. 
  • बँक अकाउंटला मोबाईल नंबर जोडलेला असेल तर फोन चोरणारा त्यावर ओटीपी पाठवून पैसे काढण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यामुळे सीम कार्ड बंद करणे गरजेचे असते. 

८. सोशल मीडियाची अकाउंट्स सुरक्षित करणे – 

  • ईमेल सोबतच सोशल माध्यमातील अकाउंट्सची सुरक्षितता जपणे गरजेची असते. 
  • फोन चोरीला गेला तर चोरणारा व्यक्ती सोशल मीडिया अकाउंट्सच्या माध्यमातून चुकीची माहिती पसरवू शकतो. 
  • व्हाट्स अँप, फेसबुक आणि इतर सोशल मीडिया अकाउंट्सवरून संदेश पाठवून गैरसमज निर्माण केले जाऊ शकतात. 
  • यासाठी सर्व अकाउंटचा पासवर्ड बदलणे गरजेचे असते. ईमेल आणि गुगलचाही पासवर्ड बदलायला हवा. 

८. मोबाईलला जोडलेली सर्व खाती बंद करा – 

  • पासवर्ड बदलूनही सुरक्षित वाटत नसेल तर त्या मोबाईल आणि सीमशी जोडलेली सर्व खाती बंद करा. 
  • दुसऱ्या मोबाईल किंवा लॅपटॉपच्या मदतीने ही खाती बंद केली जाऊ शकतात. 

नक्की वाचा : तुमचा मोबाईल सुरक्षित आहे का? 

मोबाईल असा ठेवा सुरक्षित – 

पहिला मोबाईल चोरीला गेल्यानंतर दुसरा खरेदी केल्यावर काळजी घेणे गरजेचे असते. त्यासाठी खालील उपायांचा वापर करता येऊ शकतो. 

१. जीपीएसचा वापर करणे – 

  • अँड्रॉइड फोन मध्ये लोकेशन चालू ठेवले तर मोबाईल हरवल्यानंतर शोधायला मदत होते. 
  • अँड्रॉइड डिव्हाईस मॅनेजरच्या मदतीने आपण मोबाईल सहज शोधू शकता. मोबाईल हरवला तर या डिव्हाइसच्या मदतीने त्याचे ठिकाण शोधायला मदत होते. 

२. पासवर्डच्या मदतीने फोन लॉक करा – 

  • फोन घेतल्यानंतर सर्वात आधी पासवर्ड ठेवणे गरजेचे असते. 
  • पासवर्डच्या मदतीने फोन मधील डाटा हॅक होत नाही तोपर्यंत सुरक्षित ठेवू शकतो. 

. मोबाईल इंटरनेट डाटा चालू ठेवा – 

  • मोबाईल मध्ये ट्रॅकिंग अँप असेल तर मोबाईल शोधण्यासाठी इंटरनेटची गरज लागते. 
  • फोन हरवला आणि इंटरनेट चालू असेल तर कमी वेळेत मोबाईल शोधला जातो. 

४. क्लाऊड स्टोरेजमधून डाटा डाउनलोड करून ठेवा – 

  • फोटो आणि व्हिडीओ तुम्ही क्लाउड स्टोरेजमध्ये नेहमी अपलोड करत जा. 
  • नवीन फोन घेतला तरी हा क्लाउडवरचा डाटा तुम्हाला सहज त्यात टाकणे सोपे होते. 
  • दर महिन्याला गुगल ड्राइव्ह आणि आय क्लाउड वरून डाटा घेऊन त्यातील माहिती जतन करून ठेवा. 

५. नॉन रिमूव्हेबल बॅटरीचाच फोन खरेदी करा – 

फोन चोरीला गेल्यानंतर त्यात बॅटरी असेल तर तो शोधायला मदत होते. 

  • अनेक लोकांची महत्वाची माहिती स्मार्टफोन मध्ये असते. त्यामुळे फोन चोरीला गेल्यानंतर अनेक जणांचे मोठे नुकसान होत असते. 

नक्की वाचा : मोबाईल हरवल्यास काय कराल? 

निष्कर्ष : 

  • मोबाईलची काळजी घेणे गरजेचे आहे. चुकून एखाद्या वेळेला चोरी झाला तर त्यामधील माहितीचा बॅकअप असायला हवा. 
  • मोबाईलचा वापर करताना पासवर्ड आणि पॅटर्न पद्धतीचा वापर करावा. त्यामुळे माहितीची चोरी होण्याची शक्यता कमी होते.
Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

ऑनलाईन व्यवहार करताना भीती वाटते? या टीप्स नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes मागच्या दोन वर्षात म्हणजे कोविड दरम्यान झपाट्याने काही बदललं असेल तर ते…

Ponzi Schemes: फसव्या योजना कशा ओळखाल?

Reading Time: 2 minutes गुंतवणूक तर सगळेच करतात. ज्या गुंतवणुकीमध्ये आकर्षक परतावा असेल, त्या गुंतवणुकीला लोकं प्राधान्य देतात. साहजिकच आहे, पैसा कोणाला नको असतो? पण, हे साध्य करायचा मार्ग कोणता आणि कसा आहे, याची माहिती असल्याशिवाय फक्त आकर्षित व्याजदरांमागे धावू नये. लक्षात ठेवा चकाकतं ते सोनं नसतं. आकर्षक परताव्याच्या चकचकीत ऑफर्स फसव्या असू शकतात.

मोटार अपघाताची नुकसान भरपाई?? व्हॉट्सॅप मेसेजने केलेली दिशाभूल..

Reading Time: 2 minutes काही दिवसांपूर्वी व्हॉट्स ॲपवर एक मेसेज आला होता; पोळी का करपते? दूध…