Reading Time: 3 minutes

मागच्या दोन वर्षात म्हणजे कोविड दरम्यान झपाट्याने काही बदललं असेल तर ते म्हणजे इ कॉमर्स क्षेत्र. ऑनलाईन व्यवहाराला भरपूर चालना मिळाली.ऑनलाईन शॉपिंग हा प्रत्येकाचा जवळचा मित्रच झाला असं म्हटलं तर चूक नाही. म्हणतात ना “ए फ्रेंड इन नीड इज ए फ्रेंड इन डिड !” घराबाहेर पडणं जेव्हा अशक्य होतं तेव्हा ऑनलाईन शॉपिंग मुळेच अनेक गोष्टी सोप्या झाल्या. मात्र एखादी गोष्ट आपल्याला चांगली वाटते तेव्हा आपल्याला ती गुणदोषासह स्वीकारावी लागते. तसेच काही तरी या ऑनलाईन व्यवहारांचे झालं असं म्हणावं लागेल. 

ऑनलाईन व्यवहाराचे फायदे आपल्या सर्वानाच माहित आहे, आपण आज या लेखातून ऑनलाईन खरेदी करतांना फसवणूक कशी होते हे जाणून घेऊ. 

स्वस्त म्हणजे मस्त ?

 • महागडे प्रॉडक्ट स्वस्त मिळतंय, म्हणून लगेच विकत घेतले जातात पण हातात वस्तू मिळाली की लक्षात येते,प्रॉडक्टचा दर्जा पाहिजे तसा नाही. 
 • बऱ्याचदा तुम्हाला प्रॉडक्ट देखील दिसतंय तस मिळत नाही.तुम्हाला दाखवलेला फोटो आणि प्रत्यक्षात मिळालेलं प्रॉडक्ट यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. त्यामुळे स्वस्त नेहमी मस्तच असेल असे नाही. 

जे चकाकते ते सर्व सोने नव्हे !

 • मार्केट मध्ये दररोज नवीन गोष्टी येत असतात. नवीन आलेली प्रत्येक गोष्ट चांगलीच असते असं नाही.
 • अशा प्रॉडक्टची शहानिशा करणे देखील शक्य नसते, तेव्हा हे प्रॉडक्ट विकत घेतांना काळजी घेणे गरजेचे आहे.

खात्रीपूर्वक वेबसाईट चा वापर गरजेचा !

 • आपण जिथून खरेदी करत आहे ते किती खात्रीपूर्वक आहे, फक्त फेसबुक-इंस्टाग्राम पुरता मर्यादित आहे की वेबसाईट आहे, त्यांचा फोन नंबर बरोबर आहे का? हे तपासून घ्यावे. 
 • घेतलेले प्रॉडक्ट नको असल्यास अथवा बदलून हवे असल्यास काय उपाययोजना आहे हे बघावे. 
 • आपण घेतलेले प्रॉडक्ट आधी कोणी घेतले असल्यास त्याचे रिव्ह्यू तपासून बघावे, अनेकजण प्रॉडक्ट्स चा फोटो टाकतात, प्रत्यक्षात प्रॉडक्ट कसे आहे हे सांगतात, त्यामुळे आपल्याला प्रॉडक्टचा अंदाज येतो. त्यानंतर आपण खरेदीचा विचार करावा.

 

मार्केटिंग ट्रिकच्या जाळ्यात अडकू नका  – 

 • प्रॉडक्ट विकण्यासाठी बऱ्याच  मार्केटिंग ट्रिक्स वापरल्या जातात, त्यामध्ये अडकून कुठलेही प्रॉडक्ट खरेदी करू नका. 
 • सेल प्रॉडक्ट, एक वर एक फ्री, अद्वितीय प्रॉडक्ट अशाप्रकारे प्रलोभन दाखवून तुम्ही कसे ते विकत घेतले पाहिजे याचा देखावा केला जातो. 
 • बऱ्याच वेळा तर प्रॉडक्ट आपल्या जीवनाशी भावनिकरित्या कसे जोडलं गेलं आहे हे देखील दाखवलं जातं, ज्याचा विचार करून ते प्रॉडक्ट आपणही घ्यावं असं साहजिक वाटून जातं. 

ऑनलाईन आर्थिक व्यवहार आणि फसवणूक – 

ऑनलाईन शॉपिंग साठी आर्थिक व्यवहार करतांना नकळत आपल्याकडून काही चुका होतात. आपण बऱ्याचदा न्यूजपेपर मध्ये सायबर फसवणूक मथळ्याखाली अनेक उदाहरणं वाचतो,  उदाहरणार्थ,

बंगलोर मधील एक बातमी : 

 • झोमॅटो वरून ऑर्डर केलेला पिझ्झा मिळाला ₹ 95,000 ला! पेमेंट करताना अतिमहत्वाच्या माहिती म्हणजे क्रेडिट कार्ड cvv क्रमांक, एटीएम पिन इ. गरज नसताना नकळतपणे काढून घेतली जाते आणि त्याचा गैरवापर केला जातो.  
 • अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटना कशा टाळता येऊ शकतात. त्यासाठी काही महत्वाचे मुद्दे आपण बघू –  

अकाउंट पासवर्ड लॉगिन – 

 • पासवर्ड लक्षात ठेवायला अवघड वाटत असले तरी ते हॅक करायला मात्र तेवढे अवघड नसतात. वेळोवेळी पासवर्ड बदलत राहणे महत्वाचे आहे. 
 • बायोमेट्रिक लॉगिन, ई-सिग्नेचर हेही पर्याय वापरून बघावे. यात सुरक्षितता तुलनेने जास्त असते.  

महत्वाचे  : digital transaction : ऑनलाईन पेमेंट करताना ह्या गोष्टीची घ्या काळजी 

मल्टिफॅक्टर ऑथेंटिकेशन सिस्टीम –  

 • आजकाल सगळेजण बँक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सतर्क झाले आहे, बऱ्याच बँक आपल्या खातेधारकांना मल्टिफॅक्टर ऑथेंटिकेशन सिस्टीम सुविधा देतात. यात आर्थिक व्यवहारापूर्वी सुरक्षेच्या पातळी मध्ये वाढ केलेली असते.
 • केवळ पासवर्ड पुरता मर्यादित न राहता अधिक सुरक्षा यात लक्षात घेतली जाते. 

रिमोट ऍक्सेस ला परवानगी देऊ नका – 

 • अनोळखी व्यक्तींना आपल्या कॉम्प्युटरचा रिमोट ऍक्सेस द्यायला परवानगी देऊ नका,रिमोट ऍक्सेस द्वारे तुमच्या नकळत तुमच्या कॉम्प्युटरची सर्व माहिती समोरच्या व्यक्तीला मिळू शकते. 
 • यातून तुमचे अकाउंट पासवर्ड, अकाउंट चे लॉगिन ची माहिती,  तुमची वैयक्तिक माहिती चोरली जाऊ शकते आणि याचा वापर करून अकाउंट मधले पैसे चोरणे वगैरे अशा घटना घडतात. 

OTP कधीही कोणाला सांगू नका – 

 • ऑनलाईन व्यवहार करतांना OTP चे महत्व जाणून कोणासोबत देवाण घेवाण करू नका. 
 • क्रेडिट कार्ड /डेबिट कार्ड चा पिन नंबर कोणालाही सांगू नका. 
 • वैयक्तिक माहिती संदर्भात सार्वजनिक ठिकाणी बोलू नका. 

सर्व ठिकाणी एकच पासवर्ड वापरणे टाळा – 

 • सगळ्या अकाउंट्सला एकच पासवर्ड ठेवू नका, हे धोक्याचे असू शकते. 
 • एकदा एका अकाउंटला पासवर्ड चोरीला गेला तर बाकीच्या ठिकाणी सहज वापरून इतर अकाउंट हॅक केले जाऊ शकतात. 

नोटिफिकेशन सुविधा वापरा –

 • अकाउंटच्या सुरक्षितेसाठी नोटिफिकेशन सुविधा सुरु असल्यास त्यात चुकीच्या पद्धतीने लॉगिन होत असेल तर तुम्हाला मेसेजवर किंवा ईमेलद्वारे कळवले जाऊ शकते त्यामुळे लगेच योग्य निर्णय घेऊ शकता. 

निष्कर्ष : 

 • ऑनलाईन शॉपिंग आणि व्यवहार आपल्या सोयीसाठी आहे मात्र त्याचा दुरुपयोग करून काही जण पैसे कमावतात आणि सुशिक्षित असूनही आपल्यासारखे अनेकजण पैसे गमावतात. त्यामुळेच सर्वांनी केवळ साक्षर न राहता अर्थसाक्षर होणे गरजेचे आहे.  
 • ऑनलाईन शॉपिंग करतांना सुरक्षितता महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळे निष्काळजीपणा टाळून व्यवहार करा. 
 • आपण फ़सलो आहे यापेक्षा आपण फसवले गेलो आहे हे जास्त त्रासदायक असते. त्यामुळे काळजीपूर्वक व्यवहार करा आणि घरबसल्या शॉपिंग चा आनंद घ्या. 
Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मोबाईल चोरीला गेलाय? बँकेबाबत ऑनलाईन माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी करा ‘या’ गोष्टींचे पालन

Reading Time: 3 minutes गर्दीत असताना फोन चोरीला जाण्याची दाट शक्यता असते. फोन चोरीला गेल्यानंतर वैयक्तिक…

मोटार अपघाताची नुकसान भरपाई?? व्हॉट्सॅप मेसेजने केलेली दिशाभूल..

Reading Time: 2 minutes काही दिवसांपूर्वी व्हॉट्स ॲपवर एक मेसेज आला होता; पोळी का करपते? दूध…

Ponzi Schemes: फसव्या योजना कशा ओळखाल?

Reading Time: 2 minutes गुंतवणूक तर सगळेच करतात. ज्या गुंतवणुकीमध्ये आकर्षक परतावा असेल, त्या गुंतवणुकीला लोकं प्राधान्य देतात. साहजिकच आहे, पैसा कोणाला नको असतो? पण, हे साध्य करायचा मार्ग कोणता आणि कसा आहे, याची माहिती असल्याशिवाय फक्त आकर्षित व्याजदरांमागे धावू नये. लक्षात ठेवा चकाकतं ते सोनं नसतं. आकर्षक परताव्याच्या चकचकीत ऑफर्स फसव्या असू शकतात.