आरटीजीएस (RTGS)
गेल्या दशकात भारतीय बँकिंग क्षेत्रात कमालीचे बदल झाले आहेत. पेमेंट वॉलेटच्या संकल्पनेमुळे तर वैयक्तिक व्यवहारांसाठी आरटीजीएस (RTGS) व एनईएफटीची (NEFT) सुविधा वापरण्याचे प्रमाणही कमी आले आहे. परंतु व्यवसायिक पातळीवरील मोठमोठे व्यवहार करण्यासाठी आजही इंटरनेट बँकिंगच्या RTGS व NEFT सुविधांनाच प्राधान्य दिले जाते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्णयानुसार, आरटीजीएस (RTGS) म्हणजेच ‘रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट सिस्टम’ सुविधा 14 डिसेंबरपासून म्हणजेच उद्यापासून 24 x 7 उपलब्ध असेल.
इंटरनेट बँकिंग
- भारतात इंटरनेट बँकिंग सुविधा सुरु होऊन दोन दशकांहून जास्त कालावधी होऊन गेला.
- 1998 साली आयसीआयसीआय बँकेने सर्वप्रथम ही सुविधा आपल्या ग्राहकांना उपलब्ध करून दिली होती.
- 26 मार्च 2004 पासून आरटीजीएसची सुविधा सुरु झाली होती. सुरुवातीला ही सुविधा केवळ चार बँकांमध्ये उपलब्ध होती.
- नोव्हेंबर 2005 रोजी NEFT सुविधा सुरु झाल्यावर खऱ्या अर्थाने ‘ऑनलाईन बँकिंग’ या संकल्पनेला चालना मिळाली.
- सुरुवातीला बँकेच्या वेळेतच उपलब्ध असणारी NEFT सुविधा आता 24 x 7 उपलब्ध आहे.
- डिजिटल इंडियाच्या संकल्पनेमुळे ऑनलाईन व्यवहारांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली असली तरीही भारतात ‘कॅशलेस अर्थव्यवस्थेची दिल्ली अभि दूर हि हैं.
24 x 7 आरटीजीएस (RTGS) सुविधा:
- आरबीआय मार्फत ऑक्टोबर 2020 च्या पतधोरणामध्ये आरटीजीएस सुविधा चौवीस तास उपलब्ध होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. दि. 9 डिसेंबर रोजी यासाठीची 14 डिसेंबर ही तारीख जाहीर करण्यात आली आहे.
- आरटीजीएस प्रणालीची सुविधा वर्षभर देणाऱ्या जगातील काही मोजक्या देशांच्या यादीमध्ये आता भारताने स्थान मिळवलं आहे. एनईएफटीची (NEFT) सुविधा 24×7 सुरु केल्याला एक वर्ष व्हायच्या आतच आरटीजीएस (RTGS) सुविधा चालू करून आरबीआयने बँक ग्राहकांना खुशखबर दिली आहे.
- सध्या एकूण 237 बँकांमध्ये आरटीजीएसच्या माध्यमातून दररोज 6.35 लाख व्यवहार केले जातात म्हणजेच एकूण रु. 4.17 लाख कोटींचे व्यवहार रोज होत असतात.
“आरटीजीएसची सुविधा 24 X 7 उपलब्ध झाल्यामुळे व्यवसायिकांना याचा खूप उपयोग होणार आहे. तसेच, यामुळे व्यावसायिक व्यवहार ऑनलाईन पद्धतीने करण्याचे प्रमाणहीवाढेल. भारतीय वित्तीय बाजाराचे कार्य वाढविणे आणि सीमाशुल्क देयके यासाठीही याचा फायदा होऊ शकतो, ‘असे आरबीआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies