Reading Time: 2 minutes

शेअर मार्केटमध्ये सुरुवातीला अभ्यास करून गुंतवणुकीला सुरुवात करावी. 

 1. शेअर मार्केटमध्ये नियोजन करून गुंतवणूक करा – 
 • शेअर मार्केटमध्ये नियोजन करून गुंतवणुकीला सुरुवात करावी. भविष्यातील आर्थिक ध्येय काय आहे? किती पैशांची गुंतवणूक करता येईल? किती धोका पत्करू शकता? या सर्व प्रश्नांची उत्तरे सर्वात आधी समजून घ्यायला हवीत.
 • शेअर मार्केटमध्ये वेग वेगळ्या शेअर्समध्ये कशी गुंतवणूक करता येईल, याबद्दलचे नियोजन करायला हवे. योग्य नियोजन केल्यानंतरच शेअर मार्केटमधून चांगला परतावा मिळवता येतो. 
 1. अभ्यास करून शेअर खरेदी करा – 
 • एखाद्या कंपनीचा शेअर खरेदी करण्यापूर्वी संबंधित कंपनीबद्दलचा अभ्यास करावा. 
 • कंपनीचे फायनान्शिअल स्टेटमेंट वाचावे, त्यांच्या प्रोडक्ट आणि सर्व्हिसबद्दल माहिती करून घ्यावी आणि इतर गुंतवणूकदारांनी त्या कंपनीत गुंतवणूक केली असल्यास त्यांचा सल्ला घ्यावा. 
 1. दीर्घकाळासाठी गुंतवणूक करायला हवी – 
 • शेअर मार्केटमध्ये सुरुवातीपासून दीर्घकाळासाठी गुंतवणुक करायला सुरुवात करावी. शेअर बाजार अस्थिर झाल्यास काही वेळा केलेल्या गुंतवणुकीचे मूल्य कमी होत जाते, अशावेळी न घाबरता पटकन निर्णय घेऊ नये. 
 • शेअरच्या कमी जास्त होणाऱ्या किंमती पाहून निर्णय घेऊ नये. दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळतो. 
 1. पोर्टफोलिओत वेगवेगळ्या शेअर्समध्ये गुंतवणूक करा – 
 • शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना वेग वेगळ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करायला हवी. सर्व गुंतवणूक एकाच ठिकाणी करण्याचा धोका पत्करू नये. 
 • जोखीम कमी करण्यासाठी विविध शेअर्समध्ये पैसे गुंतवायला हवे. त्यामुळे चांगला परतावा मिळतो. 

नक्की वाचा : Stock Market Portfolio : शेअर बाजारात उत्तम पोर्टफोलिओ ‘कसा’ बनवाल ?

 1. शेअर्समधून मिळालेला लाभांश गुंतवायला हवा – 
 • शेअर्समधून मिळालेला लाभांश परत त्यातच गुंतवायला हवा. 
 • अशा प्रकारे शेअर्समधून मिळालेला लाभांश गुंतवत राहिल्यास पोर्टफोलिओ वाढत जातो. भविष्यकाळात शेअर बाजारात गुंतवणूकदाराचा यामुळे चांगला पोर्टफोलिओ तयार होतो. 

नक्की वाचा : डिव्हिडंड मिळणाऱ्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी का?

आपण वरील नियमांचे पालन केले तर शेअर मार्केटमधून चांगले पैसे कमवू शकता. पण तरीही पूर्णपणे यश मिळेलच, याची शाश्वती देता येत नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे धोकादायक ठरू शकते, आपण गुंतवणूक केलेल्या रकमेचे नुकसानही होऊ शकते या बाबी लक्षात ठेवायला हव्यात.  शेअर बाजारात अशाच प्रकारची गुंतवणूक करायला हवी की तिचा तोटा झाला तरी आपण सहन करू शकता.

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना खालील गोष्टींची काळजी घ्या. 

 • सुरुवातीला कमी रकमेतून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात करा. मोठा तोटा होईल इतकी रक्कम शेअर मार्केटमध्ये गुंतवू नका. 
 • गुंतवणुकीसंदर्भात अभ्यासाला सुरुवात करा. पुस्तके, लेख आणि इतर माध्यमातून गुंतवणुकीसंदर्भातील गोष्टी शिकून घेण्यास सुरुवातीला लक्ष द्या. 
 • गुंतवणूक करण्याच्या आधी आर्थिक सल्लागाराचा सल्ला अवश्य घ्या. एक आर्थिक सल्लागार आर्थिक ध्येयानुसार नियोजन करून गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत असतो. 
 • शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना थोडा तोटा होऊ शकतो, हे लक्षात ठेवूनच गुंतवणूक करावी. 

नक्की वाचा : व्यावसायिक आर्थिक सल्लागाराची आवश्यकता

निष्कर्ष : 

 • वेळेनुसार संपत्तीत वाढ करण्यासाठी शेअर मार्केट हा सर्वोत्तम पर्याय आहे. फक्त गुंतवणूक करण्याच्या आधी अभ्यास आणि संशोधन करणे गरजेचं असते. 
 • संयम ठेवून दीर्घकाळासाठी गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळू शकतो. 
Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…