Stock Market portfolio
Stock Market portfolio
Reading Time: 3 minutes

अनेक तज्ञ गुंतवणूकदारांनी सांगितल्याप्रमाणे गुंतवणूक म्‍हणजे तुमचा निरूपयोगी पैसा योग्य ठिकाणी बचत करण्याचा मार्ग. तुम्हाला आज तुमच्या मेहनतीचे मोल मिळत आहे. योग्यरित्या बचत केल्यास भविष्यात योग्य लाभ मिळू शकतात. पैसा हे असे साधन आहे, जे असल्यास काहीही करता येऊ शकते. कंपन्या सूचीबद्ध होण्यामागील कारण म्हणजे मूल्यांकनामधून मिळालेला लाभांश व नफ्यांच्या बदल्यात लोकांकडून निधी उभारणे. बाजारात गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला विकसित होण्यासोबत तुमचा पैसा सुरक्षित ठेवण्याबाबत हमी देऊ शकणाऱ्या व्यवसायावर विश्वास ठेवावा लागतो. शेअर बाजारात गुंतवणूकीचा शुभारंभ करताना उत्तम पोर्टफोलिओ (Stock Market Portfolio )तयार करण्याबाबत मार्गदर्शन करताहेत एंजेल वन लिमिटेडचे इक्विटी स्ट्रॅटजिस्ट श्री ज्योती रॉय. 

Stock Market Portfolio :  शेयर मार्केट पोर्टफोलियो

गुंतवणूकीबाबत मुलभूत माहिती (Stock Market Investment) :

आजकाल शेअर बाजारात गुंतवणूक करणे ट्रेण्ड बनला आहे आणि बाजारातील वाढत्‍या भांडवलामधून ते स्पष्टपणे दिसून येत आहे. पण गुंतवणूकदार अगदी बारकाईने गुंतवणूक करतात. अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणजे खर्च व बचत. खरेतर लक्षात घेण्याजोगे आहे की, गुंतवणूकीमध्ये अपॉर्च्युनिटी कॉस्ट असते आणि लाभांबाबत दाखवल्या जाणाऱ्या अपेक्षांप्रमाणे स्थिती नेहमीच नसते. पैशांचे योग्य व्यवस्थापन हे शेअर बाजारातील प्रवास सुरू करण्याच्या दिशेने स्मार्ट गुंतवणूकदाराचे पहिले पाऊल आहे. 

गुंतवणूकीमध्ये सामील असलेल्या जोखीमा समजत असल्यामुळे आपण आता गुंतवणूकीसाठी मार्गांबाबत चर्चा करू शकतो. बहुतांश दलालांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्यापार केल्या जाणाऱ्या विविध मालमत्तांमध्ये गुंतवणूक करता येऊ शकते. अननुभवी गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूकीसाठी संबंधित साधने किंवा मलामत्तांसह सुरूवात करणे उत्तम आहे. या उद्देशासाठी ब्ल्यू-चिप स्टॉक्स सर्वोत्तम आहेत. हे विश्वसनीय कार्यसंचालने करणाऱ्या प्रख्यात कंपन्यांचे शेअर्स आहेत. बहुतांश अननुभवी गुंतवणूकदार निष्क्रीय गुंतवणूकीसह सुरूवात करतात. ज्यामुळे त्यांना बाजाराचे निरीक्षण करण्यास, जोखीम नियंत्रणात ठेवण्यास आणि मानवी भावनांमध्ये वाहून न जाता योग्य विचार करण्यास वेळ मिळतो.

हेही वाचा – Share Market : शेअर बाजारात प्रथमच गुंतवणूक करताना ‘या’ गोष्टींकडे द्या विशेष लक्ष…

 

गुंतवणूक क्षेत्रामधील तंत्रज्ञान प्रगती : पारंपारिक गुंतवणूक पद्धती बऱ्याच लोकांसाठी गोंधळात टाकणाऱ्या व आवाक्याबाहेर असायच्या. गुंतवणूक सल्लागार बहुतांश वेळा आपल्या मतांबाबत ठाम नसायचे आणि उच्च-मूल्य ठेवींसाठी गरजेने संभाव्य गुंतवणूकदारांमध्ये शंकेचे वातावरण निर्माण केले. सक्रियपणे गुंतवणूक केलेल्यांना त्यांच्या गुंतवणूकांबाबत माहित असल्यामुळे त्यांच्या पर्यायांबाबत जाणीव होती. दुसरीकडे निष्क्रीय गुंतवणूकदारांना पैसे कुठे व कसे गमावले हे देखील समजले नाही.

आर्थिक क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाच्या आविष्काराने तंत्रज्ञानप्रेमी गुंतवणूकदारांना आकर्षून घेतले आहे, तर हा आविष्कार निष्क्रीय गुंतवणूकदारांसाठी वरदान ठरला आहे. आधुनिक गुंतवणूक साधने उपलब्ध होणाऱ्या मोबाइल अॅप्सच्या माध्यमातून पोर्टफोलिओंचे सर्वोत्तम व्यवस्थापन करण्यामध्ये मदत करतात. आज आवश्यक ठेवी व मार्जिन्स खूपच कमी आहेत, सर्वोत्तम इंटरफेसेस नवीन गुंतवणूक सुरू करणाऱ्या गुंतवणूकदारांना ट्रेड टर्मिनल्समधून सुलभपणे ब्राऊज करण्याची सुविधा देतात. अनेक‍ संकेतक आहेत, जे व्यवहारांच्या विश्लेषणासाठी प्राइस चार्टसवर वापरता येऊ शकतात. तसेच विशिष्ट तर्कानुसार व्यापार करण्यासाठी ऑटोमेटेड अल्गोरिदम्स देखील वापरता येऊ शकतात, ज्यामुळे मानवी हस्तक्षेपाच्या घटना कमी होण्यास मदत होते.

सुरक्षित गुंतवणूकीसाठी पोर्टफोलिओमध्ये विविधता: ब्ल्यू-चिप स्टॉक्स सुरक्षित गुंतवणूकांसाठी उत्तम मार्ग आहेत, पण लक्षात ठेवा की लाभासोबत जोखीम देखील असते. प्रत्येक गुंतवणूकदाराने त्यांच्यासाठी उपयुक्त साधने ओळखण्यासाठी त्यांचे रिस्क प्रोफाइल परिभाषित करणे गरजेचे आहे. उच्च नफा मिळण्याच्या शक्यतेसह जोखीम घटक देखील वाढतो. मालमत्तेमध्ये अधिक वाढ करण्यासाठी जोखीम घटकांसह तुमच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्याचे काही मार्ग पुढीलप्रमाणे आहेत. 

  •  लार्ज-कॅप स्टॉक्सचे म्युच्युअल फंड्स
  •  लार्ज व मिड-कॅप स्टॉक्सचे डायरेक्ट शेअरहोल्डिंग
  • कर्ज बाजाराची साधने जसे लाँग-टर्म बॉण्ड्स
  • मनी मार्केट इन्स्ट्रूमेण्ट्स व शॉर्ट-टर्म बॉण्ड्स

आर्थिक संस्था व व्यावसायिक दलाल व्यवहार करत असल्यामुळे भांडवल बाजाराची साधने मनी मार्केट साधनांच्या तुलनेत सुरक्षित आहेत. दीर्घकाळापर्यंत महागाईच्या तुलनेत सर्वोत्तम उत्पन्न मिळवून देणारे कोणतेही साधन सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे. व्हॅल्यू इन्वेस्टिंग ही एक संकल्पना आहे, ज्यावर मोठ- मोठे गुंतवणूकदार त्यांच्या फंड्समध्ये सुरक्षितपणे बहुविध वाढ करण्यासाठी विश्वास ठेवतात.

हेही वाचा – शेअरबाजार: ‘LIC’ चा ‘IPO’.. मी काय करेन?…


सारांश: गुंतवणूकीसाठी निवडण्यात आलेली साधने संबंधित जोखीम घटकांव्यतिरिक्तही साध्या आकर्षून घेणाऱ्या शुल्कांवर आधारित असतात. फंड्समधून मिळणारा नफा तपासण्यासाठी गुंतवणूक करण्यायोग्य मालमत्तांवरील शुल्क व कर दायित्व त्यांच्या उत्पन्नांसह संतुलित असणे गरजेचे असते. तसेच लहान रक्कमेची विभागणी करदेखील अवघड असते. म्हणून काही मालमत्तांसह सुरूवात करत कालांतराने अधिक फंड्ससह विविधता आगणे गुंतवणूकीचा योग्य मार्ग आहे. 

थोडक्यात सांगायचे झाले तर अनेक मालमत्ता विभाग आहेत, पण प्रत्येकाला त्याबाबत सखोलपणे माहित नाही. कोणत्याही मालमत्तेमध्ये गुंतवणूक करताना उत्तमरित्या संशोधन नेहमीच लाभदायी ठरते आणि हीच बाब शेअर बाजारामधील गुंतवणूकीच्या बाबतीत देखील आहे. बाजारातील बहुतांश गुंतवणूकांमध्ये नुकसान होण्यामागील कारण म्हणजे भावनिक होऊन गुंतवणूका केलेल्या असतात किंवा मूळ मालमत्तेबाबत योग्य माहितीचा अभाव असतो. स्मार्ट बनला, धनवान व्‍हा!

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…