Arthasakshar Sovereign Gold Bonds
https://bit.ly/30z2mMR
Reading Time: 4 minutes

Sovereign Gold Bonds: सुवर्ण सार्वभौम रोखे

सरकारी रोख्यांच्या संदर्भात विशेष प्रकारच्या काही रोख्यांचा उल्लेख या आधीच्या लेखामध्ये आला होता. सुवर्ण सरकारी रोखे (Sovereign Gold Bonds) हे याच प्रकारचे रोखे आहेत. भारतीयांना सोन्याचे आकर्षण असून अनेक सण उत्सव आणि परंपरागत संस्कार यात सोन्याचे महत्व वादातीत आहे. सोने हे दुर्मिळ त्यामुळे महाग आहे. वास्तविक सोन्याहून दुर्मिळ आणि महाग असे अनेक धातू असले तरी सोन्याची झळाळी अनेकांना विशेषतः महिलांना आकर्षित करते. 

हिरे की सोने : गुंतवणूकीचा योग्य पर्याय कोणता? 

सोने खरेदी – 

 • आपण खाणीतून काढून वर्षाला 4 टन सोने उत्पादन करू शकतो, तर वर्षभरात केलेली खरेदी 800 ते 900 टन असते. 
 • हे सर्व सोने आपल्याला आयात करावे लागते. 
 • खनिज तेलाखालोखाल सर्वाधिक आयतखर्च सोने खरेदी करण्यात होतो. सोन्यावरील आयातकर वाढविल्यास अवैध मार्गाने सोने येऊन सरकारचे उत्पन्न बुडते त्यामुळेच एका विशिष्ट मर्यादेपलीकडे त्यात वाढ करता येत नाही.
 • खऱ्या अर्थाने सोने गुंतवणूक या हेतूने घेतलेच जात नाही, यात सुरक्षितता आणि भावनात्मक गुंतवणूक अधिक असते. 
 • लोक अडी-अडचणीच्या प्रसंगी उपयोगी पडेल असे सांगून सोने खरेदी करीत असले, तरी होता होईतो ते विकत नाहीत अथवा गहाण ठेवून कर्जही घेत नाहीत. असे केले तर लोक काय म्हणतील? याचाच विचार करत बसतात. 
 • दागिन्यांच्या स्वरूपात असलेले सोने मोडताना वजनात घट आणि मजुरीचे नुकसान होते. 
 • गुंतवणूक म्हणून शुध्द सोने घेणे कधीही चांगले, त्यासाठी बिस्किट अथवा नाणे बनवण्याची मजुरी त्यात मिळवली जाते. तसेच, सोन्यावर 3% तर मजुरीवर 5% जीएसटीची आकारणी केली जाते. 
 • गेल्या 6/7 महिन्यात सोन्याच्या भावात झालेली वाढ भल्याभल्यांना चक्रावून टाकणारी असल्याने अनेकांना यात अजून भाववाढ होईल असे वाटत असल्याने मागणीत वाढ पुरवठा कमी म्हणून भावात वाढ या बाजाराच्या नियमानुसार वाढ पाहण्यास मिळते. 

इक्विटी की सोने: अस्थिर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी सुरक्षित मार्ग कोणता?

कोविड-19 आणि सोन्याचे भाव 

 • कोविड-19 च्या संकटानंतर जगभराची अर्थव्यवस्था कोलमडली त्यामुळे अर्थव्यवस्थेस चालना देण्यासाठी बहुतेक सर्व देशांनी अर्थचक्र गतिमान करण्यास अनेक सवलती दिल्या. त्यातील अनेक सवलती या थेट मदत या स्वरूपातील होत्या. 
 • हा पैसा मोठ्या प्रमाणात फायदा मिळवण्याच्या हेतूने अर्थव्यवस्थेत आला आणि प्रथमच कोसळलेल्या शेअर बाजारास गती मिळाली. 
 • लोकांचा चलनावरील विश्वास कमी झाल्यास सोन्याच्या दरात वाढ होते. अनिश्चीततेच्या अशा कालखंडात अशीच गुंतवणूक मोठ्या प्रमाणात सोन्यात झाल्याने एकाच वेळी सोने व शेअर यांचे भाव वाढले. 
 • या गतीने वाढ झाल्यास शेअर बाजार आणि सोने याच वर्षी नजीकच्या काळात अजून उच्चांकी पातळीवर पोहोचतील. 
 • दिवाळीपर्यंत सोन्याचे भाव 10 ग्रॅम साठी ₹ 80000/- पर्यंत पोहोचतील असा अंदाज या क्षेत्रातील तज्ञ व्यक्त करीत आहेत. 
 • जागतिक बाजारात 1 औस सोन्याचा भाव या वर्षाच्या सुरुवातीस 1520 डॉलर्स होता तो 2000 डॉलर्स झाला आहे. 
 • या सर्वांचा विचार करून जे लोक गुंतवणूक या दृष्टीने सोन्याचा विचार करीत असतील त्यांना धातू स्वरूपातील सोन्याऐवजी गोल्ड ईटीएफ, ई गोल्ड, सुवर्ण संचय रोखे हे पर्याय उपलब्ध आहेत. यातील सुवर्ण संचय रोख्यांची माहिती आपण घेऊयात. 

सोन्यात गुंतवणूक – किती आणि कशी?

सुवर्ण संचय रोखे – ठळक वैशिष्ठे (Features of Sovereign Gold Bonds)

 • भारत सरकारद्वारा निर्मित त्यामुळे पूर्ण सुरक्षित गुंतवणूक.
 • एक रोखा म्हणजे 1 ग्रॅम सोने, याचा दर रोखेविक्री येण्यापूर्वी सुवर्ण बाजारातील सोन्याच्या दारावरून निश्चित केला जातो.
 • ‘केवायसी’ची  पूर्तता करून म्हणजेच आपली ओळख पटवून रोखे प्रमाणपत्र अथवा डी मॅट स्वरूपात घेता येतात. 
 • राष्ट्रीयीकृत बँका, खाजगी बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन व डीलर यांच्यामार्फत ठराविक अंतराने वर्षभरात त्याची विक्री केली जाते.
 • डिजिटल व्यवहारास प्रोत्साहन म्हणून या द्वारे पैसे भरणाऱ्या व्यक्तींना प्रत्येक ग्रॅममागे ₹ 50 ची सूट मिळते.
 • या रोख्यासाठी जमा केलेल्या रकमेवर दर सहा महिन्यांनी 2.5% प्रतिवर्षं या दराने व्याज मिळते. हे व्याज करपात्र आहे. 
 • व्यक्ती, हिंदू अविभक्त कुटूंब, ट्रस्ट, वित्तसंस्था विहित मर्यादेत त्याची खरेदी करू शकतात. (FEMA Act 1999 मधील तरतुदींच्या अधीन राहून) सध्या एका आर्थिक वर्षात एक व्यक्ती किमान 1 ग्रॅम तर जास्तीत-जास्त 4 किलो सोन्याची खरेदी करू शकते, तर इतरांना 20 किलो सोनखरेदी मर्यादा आहे. 
 • हे रोखे डी मॅट फॉर्म मध्ये संयुक्त नावाने तर प्रमाणपत्र स्वरूपात एकाच नावाने घेता येतील. 
 • अज्ञानाच्या नावे त्याचे पालक हे रोखे खरेदी करतील. 
 • रोखे खरेदी केल्यावर ती व्यक्ती अनिवासी भारतीय झाली तरी त्याची मुदतपूर्ती होईपर्यंत त्यास ते धारण करता येतील.
 • रोख्यांच्या वारसाची नोंद करता येईल, तसेच ते फेमा कायद्यातील तरतुदींच्या अधीन राहून अन्य कोणालाही हस्तांतरीत करता येतील.
 • या रोख्याची मुदत 8 वर्ष असून ती पूर्ण झाल्यावर त्याची भरपाई तेव्हाच्या चालू दराने करण्यात येऊन यामध्ये झालेला फायदा कितीही असला तरी त्यावर कोणताही कर द्यावा लागणार नाही, तसेच मुळातून करकपात केली जाणार नाही. 
 • पाच वर्षानंतर जरूर असल्यास हे रोखे मुदतपूर्व मोडता येतील प्रचलित दरानुसार त्याची किंमत दिली जाईल याशिवाय दुय्यम बाजारात व्यवहार करण्यासाठी त्याची नोदणी केली गेल्याने चालू बाजारभावाने त्याची खरेदी विक्री करता येऊ शकते. 
 • यातून 3 वर्षाच्या आत मिळालेला फायदा अल्पमुदतीचा भांडवली नफा समजून उत्पन्नात मिळवून त्यावरील करमोजणी करून कर द्यावा लागेल, तर 3 वर्षावरील भांडवली नफा दिर्घ मुदतीचा नफा समजून त्यावर 10 % दराने अथवा महागाई निर्देशांकानुसार मोजणी करून 20% दराने कर द्यावा लागेल. 
 • हा कर व्यक्तीने स्वतः भरायचा असून मिळणाऱ्या रकमेतून कोठेही करकपात केली जाणार नाही.
 • हे रोखे गहाण ठेवून त्यावर बँका, बिगर बँकिंग वित्तसंस्था नियमानुसार कर्ज देतील. 

ट्रेझरी बिल्स (T bills):  गुंतवणुकीचा एक सुरक्षित पर्याय! 

सुवर्ण संचय रोखे  -विक्री (Sovereign Gold Bonds -sale)

 • सध्या या महिन्याच्या रोख्याची विक्री (सन 2020 मधील 5 वी मालिका)  3 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या कालावधीत सुरू असून 1 ग्रॅम सोन्याचा दर ₹ 5334/- आहे. त्यावरील ₹ 50/- सूट वजा करून हा दर ₹5284/- एवढा राहील. 
 • नोव्हेंबर 2015 रोजी सुरू झालेली ही रोखेमालिका, सुरुवातीला दर दोन महिन्यांनी बाजारात येत होती. एप्रिल 2020 पासून दरमहा अशी विक्री करण्याची सरकारची योजना असल्याने बाजाराभावानुसार सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची संधी सर्वाना उपलब्ध आहे. 

सोन्यामध्ये आपल्या एकूण गुंतवणुकीच्या 5 ते 10% भाग असावा यावर सर्वच तज्ञांचे एकमत आहे. शक्य आहे त्यांनी प्रत्येक रोखेविक्री बरोबर किमान 1 ग्रॅम सोने खरेदी करावे आणि आपली सोनेखरेदीची नवी गुरुपुष्यामृत परंपरा निर्माण करावी. सोन्यातील असाधारण वाढीनंतर दीर्घ मुदतीच्या फायदा करमुक्त ठेवून ही योजना फार काळ चालवणे सरकारला शक्य होईल असे वाटत नाही तेव्हा तोपर्यंत उपलब्ध असलेल्या संधीचा लाभ करून घेता येईल. 

उदय पिंगळे

For suggestions and queries – Contact us: [email protected] 

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: Sovereign Gold Bonds Marathi Mahiti, SGB Marathi Mahiti, Sovereign Gold Bonds info in marathi

Share this article on :
1 comment
 1. Sovereign gold bond पुन्हा कधी sale होणार आहेत हे कसे कळणार? ठराविक schedule असते का?कारण बऱ्याचदा विक्री तारखेची मुदत संपल्यानंतर समजते कि sgb विक्री साठी उपलब्ध होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…