Reading Time: 2 minutes

 

  • १९९३ साली स्थापन झालेली ओएनजीसी ही सरकारी लार्जकॅप कंपनी असून तिचे बाजारमूल्य ३ लाख ४६ हजार २७२ कोटी रुपये आहे. अनेक सरकारी कंपन्या त्या देत असलेल्या डीव्हीडंडसाठीच ओळखल्या जातात, पण गेली पाच वर्षे त्याही चांगला परतावा देऊ लागल्या आहेत. त्यात आता ओएनजीसीचाही समावेश करावा लागेल. त्याचे कारण ही कंपनी करत असलेल्या उत्पादनांत झालेली लक्षणीय वाढ, सरकारी धोरणे आणि जगातील सध्याची परिस्थिती. 
  • ओएनजीसी ही भारतातील सर्वाधिक तेल आणि गॅस उत्पादन करणारी कंपनी आहे. मार्च २०२० मध्ये तिच्या शेअरची किंमत ५० रुपये इतकी घसरली होती. आज त्या शेअरचा भाव पाच पट म्हणजे २७५ आहे. २०१४ मध्ये ३१२ हा सर्वोच्च भाव नोंदविला असून त्या तुलनेत आता म्हणजे १० वर्षानी या कंपनीच्या नफ्यात विक्रमी वाढ अपेक्षित आहे. गेले काही दिवस युद्धामुळे शेअर बाजारात मोठी पडझड झाली असताना ओएनजीसीचा भाव १० टक्क्यांनी वाढला आहे.

नक्की वाचा : 400 लाख कोटी पार, पुढे काय?

  •  ओएनजीसी कंपनीसाठी पुढील दोन तीन वर्षे तर अतिशय चांगली ठरणार आहेत. त्याची ठळक कारणे अशी 
  1. पुढील आर्थिक वर्षात (२०२५) ओएनजीसी ५५,००० कोटी रुपयांचा नफा जाहीर करण्याची शक्यता आहे.
  2.  ओएनजीसीच्या मालकीच्या कृष्णा गोदावरी बेसिनमधील डी -५ ब्लॉकमध्ये तेल उत्पादन सुरु झाले आहे. त्यामुळे एका दशकानंतर कंपनीचे तेल आणि गॅस उत्पादन वाढणार आहे.
  3. युद्धामुळे तेलाच्या आणि गॅसच्या किंमती वाढत आहे. ओएनजीसीला आतापर्यंत प्रतिपिंप ६५ डॉलर प्रमाणे भाव मिळत होता, पण आता जागतिक बाजारात प्रतिपिंप ९० डॉलर भाव झाला आहे. त्याचा फायदा ओएनजीसीला होणार आहे.
  4.  कृष्णा गोदावरी बेसिनमधील डी -५ ब्लॉकमध्ये उत्पादित तेलावर कंपनीला अतिरिक्त एक्साईज ड्युटी भरावी लागणार नाही, शिवाय गॅसच्या किंमतीवरील सरकारी निर्बंध २०२६ पासून उठणार असल्याने सरकारी खुल्या बाजारभावा नुसार विक्री करू शकणार आहे.
  5. काही आर्थिक उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी सरकारकडून ओएनजीसीचा वापर झाल्याने कंपनीवर कर्जही झाले होते, पण ते वेगाने कमी होत आहे.

हे वाचा : Share Market Investment – शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवा

  • ओएनजीसी कंपनीची सध्याची स्थिती (एप्रिल २०२४) 
शेअरचा भाव  २७५ (१९ एप्रिल) 
पीई रेशो ८.२६ 
डीव्हीडंड ४.०९ टक्के
बाजारमूल्य ३ लाख ४६ हजार २७२ कोटी रुपये
तिमाही नफा १० हजार ३५६ कोटी रुपये (डिसेंबर २०२३ तिमाही)
एका वर्षात शेअरमध्ये झालेली वाढ ७१ टक्के (१५० वरून २७५ रुपये)
आगामी वर्षात अपेक्षित भाव ३९० रुपये 

 

(शेअर बाजाराच्या गुंतवणुकीमध्ये जोखीम ही असतेच, त्यामुळे गुंतवणूक करताना ती गृहीत धरूनच गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करावी.)

 

– यमाजी मालकर 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…