Online Banking: सुरक्षित ऑनलाईन बँकिंगसाठी ५ महत्वाच्या टिप्स

Reading Time: 3 minutes सध्या कोरोनाच्या काळात ऑनलाईन व्यवहार वरदान ठरले असले तरी अपुऱ्या माहितीमुळे किंवा सावधगिती न बाळगल्यामुळे अनेकांचे खाते रिकामे होत आहे. बारा महिने चौवीस तास बँकिंगची सोय, मोबाईल किवा कॉम्पुटरच्या एका क्लीक वर झटपट होणारे व्यवहार हे सहज सोपं वाटत असलं तरी प्रत्यक्षात असे व्यवहार करताना सतर्क राहणे गरजेचे आहे. आजच्या लेखात आपण  इंटरनेट बँकिंगचे धोके कसे टाळावे, यासाठी कोणती काळजी घ्यावी, याबद्दल सविस्तर माहिती घेऊया