क्रेडिट कार्ड कॅशबॅक एक भुलभुलैया

Reading Time: 3 minutesनवीन वर्षांचे स्वागत, विविध सणवार, स्वातंत्र्य दिन, व्हॅलेन्टाईन डे, या वर्षातील मेगा ऑफर, सुपर बंपर ऑफर अशी विविध कारणे देऊन  क्रेडिट कार्ड देत असलेली कंपनी (बँक/ वित्तीय संस्था) आपल्या ग्राहकांना कॅशबॅकची ऑफर देत असतात. ही रक्कम आपल्या खरेदीच्या बिलातून थेट कमी होते अथवा पूर्ण बिल केल्यानंतर खात्यात वेगळी परत येते. बोनस पॉईंट व्यतिरिक्त अशी संधी मिळत असल्याने, अशा आशयाची सूचना आली की ग्राहक मनातून सुखावतो आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा घेऊयात असा संकल्प सोडतो. कोणतीही गोष्ट मोफत मिळते आहे, याचे सर्वाना आकर्षण असल्याने त्याला आनंद होतो. लोकांच्या याच मनोवृत्तीचा लाभ उठवण्यात येतो. वास्तविक कोणतीही गोष्ट आपल्याला कधीच फुकट मिळत नसते.

नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड – बहुउद्देशीय प्रवासी कार्ड

Reading Time: 2 minutes‘एक देश एक कार्ड’ या उद्देशाने ‘मेक इन इंडिया’ या महत्वाकांक्षी कार्यक्रमाचा भाग म्हणून बरेच वर्ष संकल्पित असलेले नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC)  हे बहुउद्देशीय प्रवासी कार्ड ४ मार्च २०१९ पासून अस्तित्वात आले आहे. सध्या वेगवेगळ्या सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर करताना त्याचा मोबदला सामान्यतः रोख रकमेने करण्यात येतो. याचे व्यवस्थापन करणे त्रासदायक व खर्चिक आहे. रोकडविराहित व्यवहार आपणास वेगवेगळ्या कार्डसच्या माध्यमातून करावा लागत आहे. यावर मात करण्यासाठी प्रत्येक यंत्रणेने स्वतःची वेगळी कार्ड पेमेंट व्यवस्था चालू केली.