महिलांचे आर्थिक नियोजन – आर्थिक नियोजनाची सप्तपदी

Reading Time: 4 minutes नियोजन कौशल्य ही महिलांना मिळालेली एक ईश्वरी देणगी आहे. त्याचा वापर करून महिला उत्तम आर्थिक नियोजन व गुंतवणूक नियोजन देखील करू शकतात.  फक्त त्यांनी या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकणे महत्वाचे आहे. यासाठी सुरुवात तुमच्या स्वतःच्या घरापासून करा. लग्नामध्ये पतीसोबत ज्याप्रमाणे सप्तपदी चालतात तशीच ही सप्तपदी चाला आर्थिक नियोजनासाठी ! परंतु ही सप्तपदी चालण्यासाठी विवाह करण्याची गरज आहेच असं नाही.