Farmitra app : शेतकऱ्यांच्या सर्व गरजांसाठी उपयुक्त “फार्मित्रा ॲप”
Reading Time: 2 minutesभारतातील आघाडीची खासगी जनरल इन्शुरन्स कंपनी असलेल्या बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनीने ७ नोव्हेंबर २०१९ रोजी खास शेतकऱ्यांच्या गरजा ओळखून त्यासाठी उपयुक्त असे पहिले ‘फार्मित्रा’ हे मोबाइल ॲप्लिकेशन सादर केले आहे. या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून, त्यांना विमा योजनांबरोबरच शेतकामाच्या दैनंदिन गरजांसाठी पूरक माहिती आणि सल्लादेखील उपलब्ध होईल.