सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी व सुकन्या समृद्धी योजनेमध्ये सवलत

Reading Time: 2 minutesआर्थिक वर्ष २०१९-२०२० हे ३१ मार्च २०२० रोजी संपले. यापूर्वी २५ मार्च २०२० पासून जाहीर केलेल्या  लॉकडाऊनमुळे अगदी शेवटच्या क्षणी करबचत करण्याच्या हेतूने गुंतवणूक करणाऱ्या सर्वसामान्य लोकांना होत असलेल्या त्रासाचा विचार करून अपवाद म्हणून केवळ या वर्षीची ८०/क नुसार करसवलत मिळवण्यासाठीची मुदत ३० जून २०२० पर्यंत वाढवण्यात आली. सन २०२०-२०२१ ची गुंतवणूक कधी करायची? ३१ मार्च २०२० रोजी ज्यांच्या खात्याची मुदतपूर्ती होते त्यांनी काय करायचे? अशा प्रश्नांच्या अनुषंगाने काढण्यात आलेल्या आदेशात पुरेशी स्पष्टता नसल्याने त्यातून निर्माण होणारे प्रश्न सोडवण्याच्या हेतूने मार्गदर्शन पत्रके काढण्याचे काम सुरू आहे. सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी व सुकन्या समृद्धी योजना या दोन योजनांच्या सवलतींचा खुलासा करणारे पत्रक ११ एप्रिल २०२० रोजी वित्त मंत्रालयाने जारी केले असून यात केलेला खुलासा सर्व खात्यांना तात्काळ लागू झाला आहे.

आधार- पॅन लिंकींगला मुदतवाढ, जाणून घ्या कसे करायचे लिंकिंग? 

Reading Time: 2 minutes“पॅन कार्ड आणि आधार कार्ड जोडणी” म्हणजेच  आधार – पॅन लिंकिंग ही केंद्रासारकरच्या काही महत्वपूर्ण उद्दीष्टांपैकी एक आहे. १ एप्रिल २०१९ पासून इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) दाखल करण्यासाठी आधार-पॅन जोडणी अनिवार्य करण्यात आली आहे. आत्तापर्यंत ८.४७ कोटी नोंदणीकृत पॅन कार्ड धारकांपैकी केवळ ६.७७ कोटी धारकांनी पॅन क्रमांक आधारशी जोडला आहे. यापूर्वी मुदतवाढ देऊनही अनेकांनी आधार -पॅन लिंक केलेले नाही. त्यामुळे केंद्रीय अर्थमंत्रालयाने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली असून, यासाठीची अंतिम तारीख आता ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

आयटीआर: मुदतवाढ मिळाली आता तरी आळस झटकून ‘आयटीआर’ भरा 

Reading Time: 2 minutesसन २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी आयटीआर दाखल करण्यासाठी ३१ जुलै ही अंतिम तारीख  होती. मात्र, काही करदात्यांना या मुदतीत आयटीआर फाइल करण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे करदात्यांकडून मुदत वाढवण्याची मागणी सातत्याने होत होती. ही मागणी विचारात घेऊन आयटीआर दाखल करण्यासाठीची मुदत वाढविण्यात आली आहे.