आयटीआर: मुदतवाढ मिळाली आता तरी आळस झटकून ‘आयटीआर’ भरा 

http://bit.ly/2JW49SE
605

Get real time updates directly on you device, subscribe now.

Print Friendly, PDF & Email

“अरे बापरे! इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची वेबसाईट डाऊन आहे. आता मी काय करू?”

“तू अजून आयटीआर भरला नाहीस? कमाल आहे तुझी. अरे शेवटची तारीख जवळ आली आता.”

थांबा थांबा! घाबरु नका. तुमच्यासाठी खुशखबर आहे. आयकर विवरणपत्र अर्थात इन्कम टॅक्स रीटर्न भरण्यासाठीची मुदत वाढविण्यात आली आहे.

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ म्हणजेच सीबीडीटीने आयकर विवरणपत्र (ITR) दाखल करण्यासाठी मुदतवाढ दिली असून अंतिम तारीख  ३१ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. याबाबतची अधिकृत माहिती इन्कम टॅक्स विभागाच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे. 

सन २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी आयटीआर दाखल करण्यासाठी ३१ जुलै ही अंतिम तारीख  होती. मात्र, काही करदात्यांना या मुदतीत आयटीआर फाइल करण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे करदात्यांकडून मुदत वाढवण्याची मागणी सातत्याने होत होती. ही मागणी विचारात घेऊन आयटीआर दाखल करण्यासाठीची मुदत वाढविण्यात आली आहे. 

मुदत वाढवून दिली असली तरीही-

  • आळस टाळा: आता महिनाभर मुदत आहे, आता ‘नो टेन्शन’ या भ्रमात राहून शेवटच्या क्षणापर्यंत वाट बघत राहू नका. 
  • कागदपत्रे: आयटीआर फाईल करण्यासाठी लागणारी यासाठी फॉर्म १६ आणि पॅन कार्ड अशा कागदपत्रांची आवश्यकता असते. त्यामुळे सर्व कागदपत्रे तयार ठेवा. (आयकर रिटर्न भरण्यासाठीची महत्त्वाची १० कागदपत्रे)
  • दंड: दरवर्षी आयटीआर दाखल करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास आयकर विभाकडून नोटीस येऊ शकते व दंडही भरावा लागू शकतो. आयकर विवरणपत्र (ITR) दाखल करण्यासाठी ३१ ऑगस्ट पर्यंत मुदत वाढवून दिली असली तरी या अंतिम तारखेपर्यंत आयटीआर दाखल न केल्यास दंड देखील भरावा लागू शकतो. त्यामुळे अंतिम तारखेच्या आतच आयटीआर फाइल करणे आवश्यक आहे.
  • मुदतीनंतर दाखल केलेल्या आयकर विवरणपत्रावर आकारण्यात येणारा दंड पुढीलप्रमाणे 
मुदत रु. ५,००,००० पर्यंतच्या उत्पन्नावरील दंड रु. ५,००,०००  पेक्षा अधिक उत्पन्नावरील दंड
३१ ऑगस्ट २०१९ पर्यंत
१ सप्टेंबर २०१९ ते ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत १,००० ५,०००
१ जानेवारी २०२० ते ३१ मार्च २०२० पर्यंत १,००० १०,०००

आपले आयकर विवरणपत्र म्हणजेच आयटीआर  वेळच्या वेळी भरा. ३१ मार्चला संपलेल्या आर्थिक वर्षानंतर ३ महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यावरही ज्यांनी आयकर विवरणपत्र दाखल केले नसेल अथवा त्यासाठीची आवश्यक कागदपत्रे जमवली नसतील त्यांना आयकर विभागाकडून ही शेवटची संधी देण्यात आली आहे. आता तरी आळस आणि निष्काळजीपणा टाळा. निदान वाढवून दिलेल्या मुदतीत तरी आयटीआर  वेळेवर भरा. 

आयटीआर संदर्भातील अधिक माहितीसाठी  http://bit.ly/ITR_FY2018_19  या लिंकवर क्लिक करा.

 मागिल आर्थिक वर्षांचे आय.टी.आर.(ITR) भरू शकतो का?

बँक व्यवहार, परदेशी सहली आणि वीज बिल ठरवणार तुमचा ‘आयटीआर’

पगारदारांनो आयकर विवरणपत्र भरताना ही काळजी घ्या

आयकर रिटर्न वेळेत दाखल करण्याचे ९ फायदे

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.