आपलं आधार कार्ड सुरक्षित आहे का?

Reading Time: 2 minutesआधारकार्ड आणि सामान्य माणसाचा मुलभूत अधिकार यांच्या मध्ये दीर्घकाळ वाद सुरु होता. ‘राईट टू प्रायव्हसी (Right to privacy) मुलभूत अधिकार मानायचा तर आधारकार्डला आपली सर्व माहिती जोडणे बंधनकारक केले आहे. अशा वेळी, “सरकार आमची माहिती गोपनिय ठेवण्यास किती समर्थ आहे?” हा सामान्य प्रश्न लोकांकडून आला. आधारकार्ड संदर्भातली माहितीची गोपनीयता जशी सरकारची जबाबदारी आहे तशीच ती आपल्या प्रत्येकाचीही आहे.