You cannot copy content of this page

आपलं आधार कार्ड सुरक्षित आहे का?

0 431

Get real time updates directly on you device, subscribe now.

Print Friendly, PDF & Email

आधारकार्ड आणि सामान्य माणसाचा मुलभूत अधिकार यांच्या मध्ये दीर्घकाळ वाद सुरु होता. “राईट टू प्रायव्हसी (Right to privacy)” मुलभूत अधिकार मानायचा तर आधारकार्डला आपली सर्व माहिती जोडणे बंधनकारक केले आहे.

अशा वेळी, “सरकार आमची माहिती गोपनिय ठेवण्यास किती समर्थ आहे?” हा सामान्य प्रश्न लोकांकडून आला. आधारकार्ड संदर्भातील माहितीची गोपनीयता जशी सरकारची जबाबदारी आहे तशीच ती आपल्या प्रत्येकाचीही आहे.

 • आपलं आधारकार्ड आणि १२ अंकी आयडी कुठेही चुकीच्या ठिकाणी वापरला जाऊ नये यासाठी काही सूचना, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) यांच्या कडून देण्यात आल्या आहेत. त्यांचे पालन केल्यास आपले आधारकार्ड आणि त्यासंबंधित सर्व माहिती गैरवापर होण्यापासून रोखली जाऊ शकते.
 • काही दिवसांपूर्वी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ट्रायचे (TRAI) प्रमुख आरएस शर्मा यांनी ट्वीटरवर आपल्या आधारची माहिती पोस्ट केल्याने त्याचा गैरवापर करता येऊ शकतो का?  हे तपासले. या घटनेनंतर सर्वत्र असुरक्षतेचे वातावरण निर्माण झाले. लोकांना अशा उठाठेवी करण्यापासून रोकण्यासाठी यूआयडीएआयने (UIDAI) काही सूचना आणि कडक बंधने घातली आहेत.
  • सार्वजनिक ठिकाणी, अर्थात थेट लोकांमध्ये किंवा सोशल मिडिया वर आपले आधार आणि संबधित माहिती  पोस्ट करण्याची बंदी यूआयडीएआयने केली आहे आणि एखाद्याने तसे केले असेल तर असा गुन्हा शिक्षेस पत्र समजला जाईल.
  • यूआयडीएआय नुसार आपली गोपनिय माहिती सोशल मिडिया वर लिहिणे आणि पोस्ट करणे  धोकादायक आहे असे न केल्यास कायदाभंग करण्याची शिक्षा दिली जाऊ शकते.
  • ती व्यक्ती स्वतः सोडून इतर कोणीही इतर कोणाच्याही आधार आयडीचा वापर करून ओळख पटवण्याचा प्रयत्न केला , तर अशा  तोतयागिरी करणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल.
  • सार्वजनिक ठिकाणी अशी माहिती जाहीर केल्याने आधार कार्ड फोटोशॉप केले जाऊ शकते आणि बायोमेट्रिक्स प्रमाणीकरणाच्या ठिकाणी वापरले जाऊन त्याचा गैरवापर होण्याची शक्यता वाढते, या हेतूने सार्वजनिक ठिकाणी आपला आधार क्रमांक आणि तत्सम माहिती जाहीर करू नये अश्या सूचना वारंवार दिल्या जातात. त्यामुळे स्वतःचे आधार कार्ड नेहमी सुरक्षित आणि गोपनीय राहील याची काळजी घ्यावी.
  • कोणत्याही प्रमाणित कार्यालयाशिवाय कोणालाही १२ अंकी आधार क्रमांक आणि कोणतीही माहिती देऊ नये. तसेच जवळच्या व्यक्ती किंवा मित्र यानाही तुमचे अधार कार्ड वापरून तुमची ओळख पटवून देणे हा गुन्हा आहे आणि ज्यासाठी शिक्षा होऊ शकते.

लक्षात ठेवा, आधार तुमचा अधिकार आहे. तसेच हे संवेदनशील कागदपत्र  ही आपली जबाबदारी आहे. आधारचे फायदे जसे अत्यंत लाभदायक आहेत, तसेच आधारचा गैरवापर मोठे नुकसान करू शकते.  

आधार बरोबर पॅन लिंक करणे अनिवार्य !प्लॅस्टिक आधार कार्ड अधिकृत नाही

आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला info@arthasakshar.com वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर’ या नावाने सेव्ह करून  ह्या नंबरवर ‘Hi’ असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर |

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.