मुलींचे भविष्य अधिक सुरक्षित करणारी सुकन्या समृद्धी योजना !

Reading Time: 4 minutes अलीकडच्या काळामध्ये पालक हे त्यांच्या मुलांच्या आर्थिक भविष्याबाबत अधिक सतर्क व जागरूक…

सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी व सुकन्या समृद्धी योजनेमध्ये सवलत

Reading Time: 2 minutes आर्थिक वर्ष २०१९-२०२० हे ३१ मार्च २०२० रोजी संपले. यापूर्वी २५ मार्च २०२० पासून जाहीर केलेल्या  लॉकडाऊनमुळे अगदी शेवटच्या क्षणी करबचत करण्याच्या हेतूने गुंतवणूक करणाऱ्या सर्वसामान्य लोकांना होत असलेल्या त्रासाचा विचार करून अपवाद म्हणून केवळ या वर्षीची ८०/क नुसार करसवलत मिळवण्यासाठीची मुदत ३० जून २०२० पर्यंत वाढवण्यात आली. सन २०२०-२०२१ ची गुंतवणूक कधी करायची? ३१ मार्च २०२० रोजी ज्यांच्या खात्याची मुदतपूर्ती होते त्यांनी काय करायचे? अशा प्रश्नांच्या अनुषंगाने काढण्यात आलेल्या आदेशात पुरेशी स्पष्टता नसल्याने त्यातून निर्माण होणारे प्रश्न सोडवण्याच्या हेतूने मार्गदर्शन पत्रके काढण्याचे काम सुरू आहे. सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी व सुकन्या समृद्धी योजना या दोन योजनांच्या सवलतींचा खुलासा करणारे पत्रक ११ एप्रिल २०२० रोजी वित्त मंत्रालयाने जारी केले असून यात केलेला खुलासा सर्व खात्यांना तात्काळ लागू झाला आहे.

नववर्षासाठी ५ महत्वाचे गुंतवणूक पर्याय

Reading Time: 2 minutes आज चैत्र पाडवा! हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. या नवीन वर्षात पंचांग पूजनासोबत आपल्या भविष्याच्या तरतुदीचाही संकल्प करा. पारंपरिक सणाच्या मुहूर्तावर गुंतवणुकीच्या आधुनिक, आवश्यक आणि स्मार्ट पर्यायांचाही विचार करा. नवीन आर्थिक वर्षात गुंतवणुकीचे प्रत्येकाचे वेगवेगळे प्लॅन्स ठरलेले असतीलच. नववर्षात गुंतवणूक करताना खालील साध्या, सोप्या पण आवश्यक पर्यायांना प्राधान्य द्या.

सुकन्या समृद्धी योजना वि. सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी

Reading Time: 3 minutes एसएसवाय ही दीर्घ मुदतीच्या दृष्टीने सुरू करण्यात आलेली चांगली योजना आहे.  ही योजना विशेषतः आपल्या मुलीच्या भविष्याच्या दृष्टीने लाभदायक योजना आहे. परंतु, इतक्या दीर्घकालीन गुंतवणुकीची गरज वाटत नसल्यास पीपीएफ हा एक चांगला पर्याय आहे. वेळेची लवचिकता देणारा पीपीएफ योजना उपयुक्त असून यामध्ये कोणीही गुंतवणूक  करू शकते. दोन्ही योजना कर बचतीच्या उत्तम मार्गांपैकी आहेत. कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा, हे मात्र प्रत्येकाने आपआपल्या गरजांचा विचार करून ठरवावे. संभ्रमाच्या वेळी अर्थाताज्ञाचा सल्ला घ्यायला हरकत नाही.

सुकन्या समृद्धी योजना – भाग ३

Reading Time: 2 minutes सुकन्या समृद्धी योजनेचे सर्व फायदे समजले असतील तर आपल्या मुलीच्या पंखाना बळ देण्यासाठी महत्वाचं पाऊल म्हणजे, तिच्या दूरगामी भविष्याची सोय करून ठेवणं. यासाठी तुम्हाला सुकन्या समृद्धी योजना (SSY) हा उत्तम पर्याय आहे. या भागात सुकन्या समृद्धी खात्यासंदर्भात पडणारे महत्वाचे प्रश्न व उत्तरे जाणून घेऊया.  

सुकन्या समृद्धी योजना- नियम व वैशिष्ठ्ये

Reading Time: 2 minutes एखाद्या मुलीच्या नावावर सुकन्या समृद्धी खाते उघडायचे असेल तर नैसर्गिक (जैविक) पालक किंवा कायदेशीर पालक यांच्याकडून उघडले जाऊ शकते. मुलीच्या जन्मापासून ती दहा वर्षांची होईपर्यंत मुलीच्या नावावर हे खाते उघडता येते. हे खाते पोस्ट ऑफिसमध्ये किंवा पीईफ सुविधा पुरवणाऱ्या बँकेत अथवा काही सरकारी बँकेत उघडता येते. संबंधित बँकेच्या सर्व शाखांमध्ये हे खाते उघडता येते का? याची एकदा खात्री करा. (स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), एसबीएच, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, आंध्रा बँक, यूको बँक, इलाहाबाद बँक, कॉर्पोरेशन बँक इ. बँकांच्या शाखामध्ये ही सुविधा आहे). तसेच रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानुसार आयसीआयसीआय बँक व ऍक्सिस बँक या खाजगी बँकांमध्येही हे खाते उघडता येते.

सुकन्या समृद्धी योजना – भाग १

Reading Time: 2 minutes घरात कन्यारत्नाचं स्वागत तर जोरदार झालं, पण तिच्या भविष्याची काळजी वाटते? पालक म्हणून तिच्या शिक्षण आणि लग्नासाठीच्या खर्चाची तरतूद काय आहे? तुमचं तुमच्या मुलीवर असलेलं प्रेम व्यक्त करण्याची सुवर्ण संधी एक सरकारी योजना तुम्हाला देते आहे. जिचं नाव आहे ‘सुकन्या समृद्धी योजना’. तुमची लाडकी लेक सज्ञान होई पर्यंत प्रती महिना गुंतवणूक करा आणि तिच्या भविष्य बद्दल निश्चिंत व्हा!