Reading Time: 2 minutes

आज चैत्र पाडवा! हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. या नवीन वर्षात पंचांग पूजनासोबत आपल्या भविष्याच्या तरतुदीचाही संकल्प करा. पारंपरिक सणाच्या मुहूर्तावर गुंतवणुकीच्या आधुनिक, आवश्यक आणि स्मार्ट पर्यायांचाही विचार करा.

नवीन आर्थिक वर्षात गुंतवणुकीचे प्रत्येकाचे वेगवेगळे प्लॅन्स ठरलेले असतीलच. नववर्षात गुंतवणूक करताना खालील साध्या, सोप्या पण आवश्यक पर्यायांना प्राधान्य द्या.

१. आरोग्य  विमा (Health Insurance):

  • आरोग्यावर होणाऱ्या खर्चामुळे अनेकदा आपलं आर्थिक नियोजन बिघडत जातं. सन २०११ मध्ये लॅसेटने त्याच्या लेखात नमूद केल्यानुसार आरोग्य सेवा खर्च (Medical  Expenses) वाढल्यामुळे दरवर्षी सुमारे ३९ दशलक्ष भारतीयांची आर्थिक स्थिती खालावत जाते.यावरून आरोग्य विम्याची असणारी गरज आपल्या सहज लक्षात येईल.
  • अनेकदा आपल्या आयुष्यभराची कमाई एखाद्या आजारपणात खर्च होते अशावेळी आरोग्य विमा आपल्याला मदतीचा हात देतो. याशिवाय यामध्ये केलेली गुंतवणूक करमुक्त असते. त्यामुळे आपल्याला याचा ‘डबल बेनिफिट’ मिळतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

२. भविष्यनिर्वाह निधी (Provident Fund):

  • भविष्यनिर्वाह निधी (Provident Fund) साठी दर महिन्याला एक ठराविक रक्कम आपल्या पगारमधून  कपात केली जाते. ही रक्कम म्हणजे एक प्रकारे आपली गुंतवणूक आहे. ही रक्कम नियमानुसार निश्चित आणि बंधनकारक असते. परंतु, असे असले तरीही आपण या रकमेमध्ये वाढ करू शकतो.
  • आपल्या  भविष्यनिर्वाह निधीच्या रकमेत वाढ करा. ही एक प्रकारची दीर्घकालीन गुंतवणूक आहे. भविष्यनिर्वाहनिधीचा व्याजदर हा साधारणत: ८ ते ९% च्या आसपास असतो. त्यामुळे यामध्ये  चक्रवाढ वाढीनुसार मिळणारा फायदा आपल्याला दीर्घकाळामध्ये दिसून येतो.

३. एसआयपी (SIP):

  • सिपमध्ये तुम्ही -प्रतिमाह कमी कमी  ५०० रुपयांपासून पुढे कितीही रक्कम गुंतवून उत्तम परतावा मिळवू शकता. सर्वसामान्य माणसांना अनेक आर्थिक जबाबदाऱ्यांमुळे बचत करून मोठी गुंतवणूक करणे तसे कठीण असते. शिवाय ते जोखमीचेही असते. पण सिपमध्ये गुंतवलेली लहान रक्कमही चांगला परतावा देते.
  • ज्यांना शेअर बाजारात थेट गुंतवणुकीची जोखीम घ्यायची नाही परंतु बाजाराचा चढ-उताराचा फायदा घ्यायचा आहे त्यांचासाठी म्युच्युअल फंड मधील गुंतवणूक सोयीस्कर ठरू शकते. जर १५ वर्षांसाठी एसआयपीमध्ये २०,००० रुपयांची केली व दरवर्षी त्यामध्ये  २००० रुपयांची वाढ केली तर मिळणारा परतावा साधारणतः दोन कोटींच्या आसपास असेल.

४. राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS):-

  • निवृत्तिनियोजन हा एक महत्वाचा विषय आहे. २००५ पूर्वी सरकारी नोकरीत रुजू झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन मिळते/मिळेल. परंतु इतरांसाठी मात्र निवृत्तीनियोजन अत्यंत आवश्यक आहे.
  • ‘एनपीएस’ ही एक निवृत्तीवेतन योजना असून दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी एक चांगला पर्याय आहे. एनपीएस गुंतवणूकीस कलम ८० सी च्या अंतर्गत करवजावट मिळते. तसेच कलम ८० सीसीडी (१बी)अंतर्गत ‘एनपीएस’मधील रु. ५० हजारांच्या गुंतवणुकीची रक्कम अतिरिक्त करवजावटीस पात्र असते.

५. मुलांसाठी आर्थिक गुंतवणूक

  • वाढते शैक्षणिक खर्च लक्षात घेता मुलांच्या शिक्षणाची तरतूद आत्तापासूनच केल्यास पुढे त्यांच्या शिक्षणात आर्थिक अडचण येणार नाही किंवा शैक्षणिक कर्ज घ्यायची वेळ येणार नाही. अनेक बँकांमध्ये मुलांसाठी ‘झिरो बॅलन्स अकाउंट’ अथवा जास्त व्याजदर देणाऱ्या अकाऊंटची सुविधा उपलब्ध आहे. त्याचा लाभ घ्या.
  • मुलांसाठी असणारे विविध ‘चिल्ड्रेन प्लॅन्स’मध्ये गुंतवणूक करा. तुम्हाला मुलगी असल्यास सुकन्या समृद्धी योजनेमध्ये (SSY) गुंतवणूक करू शकता. सुकन्या समृद्धी योजनेमधील गुंतवणूकीस करबचतीचाही लाभ मिळतो. कलम ८०सी अंतर्गत, सुकन्या समृद्धि खात्यावर प्रतिवर्ष दीड लाख रुपयांपर्यंत करकपातीचा लाभ मिळतो.

टीम अर्थसाक्षर तर्फे गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!

संकल्प जुनेच आर्थिक वर्ष नवे,  आरोग्य विमा खरेदी करण्याची 8 महत्वाची कारणे,  

करबचतीचे सोपे मार्ग,  कलम ८०सी अंतर्गत करबचतीचे १० विविध पर्याय

आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला info@arthasakshar.com वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर’ या नावाने सेव्ह करून  ह्या नंबरवर ‘Hi’ असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

वॉरेन बफेट यांनी दिलेले गुंतवणूकीचे धडे !

Reading Time: 2 minutes अर्थविश्वातील गुंतवणूकीमधील बाराखडीचे गुरु म्हणजे वॉरेन बफेट यांचे नाव घेतले जाते. वॉरेन बफेट हे नाव, त्यांचे गुंतवणूकीचे ज्ञान आणि शेअर बाजारातील अनुभवांचे…