Reading Time: 3 minutes

सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (PPF) म्हणजे काय?

 • कर-मुक्त बचत करण्याचा एक उत्तम पर्याय म्हणजे सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (PPF) योजना.
 • १९६८ मध्ये भारतातील वित्त मंत्रालयाने (एमओएफ) सादर केला होता.
 • पीपीएफ खात्यातील ठेवींवर मिळणारे व्याज करपात्र नाही. पीपीएफ खात्यांकडे जमा केलेल्या ठेवींवर कर कपात केली जाऊ शकतो.
 • यामुळे पीपीएफ योजना भारतातील सर्वात कर-सक्षम गुंतवणुकीपैकी एक बनली. सर्वसाधारणपणे भारतीयांमधील बचत प्रोत्साहित करण्यासाठी, विशेषत: सेवानिवृत्तीचा विचार करून  बचत करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी ही योजना अस्तित्वात आली.

काय आहे सुकन्या समृद्धि योजना?

 • मुलांच्या जन्मानंतर जबाबदाऱ्या वाढत जातात. शिक्षण,आरोग्य,मनोरंजन आणि अनेक गोष्टीची यादी लाबंत जाते. विशेतः, मुलींच्या गरजा आणि खर्चांकडे पुरुषप्रधान संस्कृतीत दुर्लक्ष होते आलं आहे.
 • मुलींचे लग्न आणि शिक्षण खर्चाचा बोजा न वाटता, गुंतवणुकीचा आणि सवयी चा भाग होईल अशी योजना देशात असली पाहिजे हा विचार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुकन्या समृद्धि खात्याचे उद्घाटन केले.
 • या योजनेअंतर्गत मुलीच्या नावाने एक बचत खाते उघडले जाते. सादर खाते पोस्ट ऑफिस किंवा देशातील काही बॅंकांमध्ये आणि देशभरात उघडले जाऊ शकते.
 • २०१५-१६ पर्यंत या खात्यात व्याज दर ९.२% होते तर २०१४ साठी खातेधारकांनी खात्यासाठी ९.२% व्याज दिले होते. या प्रकारचे खाते गुंतवणूक आणि करबचत करण्यासाठी देखील कमी येते.

सुकन्या समृद्धि योजना (SSY) आणि पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF)

 • सुकन्या समृद्धि योजना (SSY) आणि सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (PPF) हे दोन्ही बचतीचे उत्तम पर्याय असून दोन्हीही पूर्णपणे कर-मुक्त आहेत.
 • यामध्ये भारत सरकारची हमी तर मिळतेच शिवाय दोन्ही गुंतवणुकींमध्ये  गुंतवलेल्या रकमेवर कर-मुक्त व्याज आणि आयकरामध्ये ८०% पर्यंत वजावट मिळते. थोडक्यात, दोन्हीमध्ये कर सवलत मिळते.
 • याव्यतिरिक्त, एसएसवाय आणि पीपीएफ योजना इतर प्रचलित एफडी पेक्षा जास्त व्याजदर देतात. परंतु एसएसवाय योजनेमध्ये जास्त व्याजदर असल्यामुळे  ही योजना पीपीएफपेक्षा अधिक फायदेशीर आहे.
 • सध्या एसएसवाय वर वार्षिक व्याजदर ८.५ टक्के आहे, तर पीपीएफचा दर ८ टक्के आहे.  
 • कोणीही पॅनकार्डधारक पीपीएफमध्ये गुंतवणूक करू शकतो, तर सुकन्या समृद्धी योजनेमध्ये फक्त मुलीच्या पालकांनाच गुंतवणूक करता येते.

सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (PPF) विरुद्ध सुकन्या समृद्धि योजना –

सार्वजनिक भविष्य निधी आणि सुकन्या समृद्धि योजना यांमधील फरकाचा आढावा घेऊया-

 1. पीपीएफ खात्याच्या परिपक्वतेनंतर(Maturity), पुढच्या ५ वर्षांसाठी कितीही वेळा कार्यकाल वाढवू शकता. एसएसवायच्या बाबतीत १४ वर्षापेक्षा जास्त विस्तार लागू होतो परंतु तो केवळ ७ वर्षांचा असतो, म्हणजे हे खाते जास्तीत जास्त २१ वर्ष चालू राहू शकते.
 2. पीपीएफ ठेवींसाठी रोख रक्कम, चेक, पीओ, डीडी, ऑनलाइन निधी हस्तांतरण करून केले जाऊ शकते,  तर एसएसवाय खात्यासाठी फक्त रोख रक्कम, चेक आणि डीडी स्वीकारले जातात.
 3. पीपीएफला ऑनलाइन व्यवहार करता येतात, तर एसएसवायमध्ये त्यांच्या खातेधारकांना ही सुविधा अद्याप उपलब्ध नाही.
 4. मुलगी १८ वर्षांची  झाल्यावर आंशिक पैसे काढणे उपलब्ध आहे,  पण केवळ ५०% एवढीच रक्कम काढता येते. तर पीपीएफ मध्ये ७ वर्ष पूर्ण झालेले खाते, प्रत्येक वर्षी आंशिक अकाली पैसे काढण्याची परवानगी देते अर्थात यासाठीही काही अटी लागू आहेत. पूर्णपणे पैसे  काढणे केवळ परिपक्वतेच्या वेळीच शक्य आहे.
 5. १८ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे निवासी भारतीय लोक भविष्य निधी खाते उघडू शकतात. हे खाते उघडण्यासाठी कोणतीही वयोमर्यादा नाही. विशिष्ट परिस्थितीत अल्पवयीनांसाठी पीपीएफ उघडले जाऊ शकते. परंतु एसएसवाय खाते फक्त मुलींसाठीच उघडता येते.
 6. पीपीएफ खाते उघडल्यानंतर किंवा त्यानंतर नामांकित कोणत्याही नावावर केले जाऊ शकते. मात्र, एसएसवायची अंतिम हक्कदार केवळ ती मुलगीच असते.
 7. पीपीएफ खात्यास सक्रिय ठेवण्यासाठी  किमान ५०० रू. वार्षिक ठेव ठेवावीलागते. तर एसएसवायसाठी कमीतकमी २५०रू. रक्कम प्रतिवर्ष जमा करणे आवश्यक आहे.

सुकन्या समृद्धि योजनेचे तोटे-

 1. दीर्घकालीन गुंतवणूक असल्याने, तात्काळ गरजा पूर्ण करू शकत नाही.
 2. या योजनेअंतर्गत एका व्यक्तीच्या नावे एकच खाते उघडता येते.  
 3. पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडले असल्यास या खात्यात ऑनलाइन हस्तांतरणाची (Online Transfer) सुविधा पुरवली जात नाही. यामध्ये फक्त रोख, चेक आणि डिमांड ड्राफ्टद्वारे पैसे जमा करता येतात.
 4. या  योजनेत व्याजदर सतत बदलत असल्याने, भाविष्यात काय व्याजदर असेल हे सांगणे अवघड आहे. पण सध्या तरी हा व्याजदर फायदेशीर आहे.

सुकन्या समृद्धि खाते योजनेचे फायदे-

 1. उच्च व्याज दर
 2. कलम ८० सी अंतर्गत तुम्ही करबचत करू शकता.
 3. खात्याची मॅच्युरिटी झाल्यानंतर पैसे प्रत्यक्ष मुलीचाच हातात पडतील अशी खात्री असते.
 4. ठेवींमध्ये लवचिकता- कितीही रक्कम रक्कम रु. २५० पासून  एका वर्षात कमाल मर्यादा १.५० लाखापर्यंत बचत करू शकता.
 5. भारतात कोठेही हस्तांतरणाची मागणी केल्यास ते शक्य आहे.
 6. मुलगी १० वर्षाची झाल्यावर स्वतः हे खाते  सांभाळू शकते.

निष्कर्ष

 • एसएसवाय ही दीर्घ मुदतीच्या दृष्टीने सुरू करण्यात आलेली चांगली योजना आहे.  ही योजना विशेषतः आपल्या मुलीच्या भविष्याच्या दृष्टीने लाभदायक योजना आहे. परंतु, इतक्या दीर्घकालीन गुंतवणुकीची गरज वाटत नसल्यास पीपीएफ हा एक चांगला पर्याय आहे.
 • वेळेची लवचिकता देणारी पीपीएफ योजना उपयुक्त असून यामध्ये कोणीही गुंतवणूक  करू शकते.
 • दोन्ही योजना कर बचतीच्या उत्तम मार्गांपैकी आहेत. कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा, हे मात्र प्रत्येकाने आपआपल्या गरजांचा विचार करून ठरवावे. संभ्रमाच्या वेळी अर्थाताज्ञाचा सल्ला घ्यायला हरकत नाही.

(चित्रसौजन्य: https://bit.ly/2AHZUq5 )

 सुकन्या समृद्धी योजना – भाग १ ,  सुकन्या समृद्धी योजना- नियम व वैशिष्ठ्ये ,

सुकन्या समृद्धी योजना – भाग ३सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी – मुदतपूर्तीनंतरचे विविध पर्याय

(आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला info@arthasakshar.com वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर‘ या नावाने सेव्ह करून  ह्या नंबरवर ‘अपडेट’ (Update) असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

(Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा.)

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

वॉरेन बफेट यांनी दिलेले गुंतवणूकीचे धडे !

Reading Time: 2 minutes अर्थविश्वातील गुंतवणूकीमधील बाराखडीचे गुरु म्हणजे वॉरेन बफेट यांचे नाव घेतले जाते. वॉरेन बफेट हे नाव, त्यांचे गुंतवणूकीचे ज्ञान आणि शेअर बाजारातील अनुभवांचे…