Reading Time: 4 minutes

अलीकडच्या काळामध्ये पालक हे त्यांच्या मुलांच्या आर्थिक भविष्याबाबत अधिक सतर्क व जागरूक आहेत. खासकरून मुलींच्या जन्मानंतर तिच्या भविष्याची, लग्नाची व तिच्या सुरक्षिततेची जास्त काळजी असते. त्यामुळे लवकरात लवकर गुंतवणूकीला (Investment) सुरुवात करण्यास ते अधिक प्राधान्य देतात. 

मात्र आजच्या महागाईच्या काळात वाढत्या खर्चांमुळे लोकांच्या बचतीवर मोठा परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत तुम्ही चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करावी, जिथे उत्तम परतावा मिळण्याची शक्यता खूप जास्त असते. 

मुलींचे भविष्य अधिक सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकारद्वारे २०१५ साली ‘सुकन्या समृद्धी योजना’ सुरु करण्यात आली आहे. इथे तुमच्या बचतीचे पैसे गुंतवून तुम्ही तुमच्या मुलींचे आर्थिक भविष्य अधिक सुरक्षित करू शकता. (Sukanya Samriddhi Yojana)

या लेखामध्ये आपण सुकन्या समृद्धी योजनेविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. 

नक्की वाचा – बचत खात्यात मोठी रक्कम ठेवणे म्हणजे वेळ वाया घालवणे का ? 

‘सुकन्या समृद्धी योजना’ काय आहे ?

  • सुकन्या समृद्धी योजना ही एक प्रकारची गुंतवणूक बचत योजना केंद्र सरकारद्वारे २०१५ साली सुरु करण्यात आली. 
  • मुलींच्या भवितव्यासाठी तिच्या पालकांनी खात्यात जमा केलेली गुंतवणूक म्हणजे ही सुकन्या समृद्धी योजना मानली जाते.
  • मध्यमवर्गीय कुटुंबातील १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींच्या पालकांना त्यांच्या मुलीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी ही योजना उपयुक्त आहे. 
  • या योजनेअंतर्गत मुलीचे गुंतवणूक खाते पालकांद्वारे उघडले जाते. हे खाते मुलीच्या २१ वर्षापर्यंत किंवा १८ वर्षे वयानंतर तिच्या लग्नापर्यंत चालवले जाते. परंतू या खात्यात किमान १५ वर्षांसाठी गुंतवणूक करणे बंधनकारक आहे.
  • २०२२-२३ साठी या खात्यावर गुंतवलेल्या रकमेवर ७.६ टक्के दराने व्याज दिले जाते. या योजनेंतर्गत १ वर्षात जास्तीत जास्त १.५ लाख रुपयांच्या गुंतवणुकीसाठी आयकर कायदा १९६१ च्या कलम ८० सी अंतर्गत कर सवलत देखील दिली जाते.

हेही वाचा – नामांकानाचे महत्त्व ! 

योजनेचे फायदे (Benefits of Sukanya Yojana) 

  • सरकारकडून पैशाची हमी असणाऱ्या सुकन्या समृद्धी योजनेमुळे मुलीचे भविष्य सुरक्षित होण्यास मदत होते.  
  • सुकन्या समृद्धी योजना एक अत्यंत कमी गुंतवणूक बचत योजना आहे. तसेच या योजनेअंतर्गत लाभार्थ्यास चांगला व्याजदर मिळतो.
  • मुलीचे शिक्षण, आरोग्य, लग्न व तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही एक उत्तम बचत योजना आहे. देशातील प्रत्येक मुलगी या योजनेचा लाभ घेऊ शकते.
  • कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडून लाभ घेता येतो. जमा रकमेवर चक्रवाढ पद्धतीने व्याज दर मिळते.
  • या योजनेचा कालावधी २१ वर्षाचा असला तरी लाभार्थ्याला फक्त १५ वर्षापर्यंत पैसे भरावे लागतात. पुढील १५ ते २१ वर्षे पैसे भरावे लागत नाहीत. 
  • सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत आयुर्विमा महामंडळामार्फत राबविल्या जाणाऱ्या केंद्र शासनाच्या आम आदमी विमा योजनेअंतर्गत सदर मुलीच्या नावे जमा केलेल्या रकमेतून फक्त रु. १०० प्रतिवर्ष इतका हप्ता जमा करून सदर मुलीच्या कमावत्या पालकाचा विमा उतरवला जातो.
  • यामुळे पालकाचा अपघात अथवा मृत्यू झाल्यास लाभार्थ्याच्या वारसाला किमान रु.३०,००० ते रु.७५,००० आर्थिक मदत दिली जाते.
  • अनाथ मुलीला दत्तक घेतल्यास देखील सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत लाभ दिला जातो.

नक्की वाचा- सुरक्षाकवच कायम ठेवणारा आरोग्यविमा 

योजनेची पात्रता – (Eligibility Criteria)

  • मुलीच्या जन्मापासून ती १० वर्षाची होईपर्यंत या कालावधीत सुकन्या समृद्धी योजना खाते उघडणे गरजेचे आहे. सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ फक्त १० वर्षाखालील मुलींनाच घेता येतो.
  • जर एखाद्या कुटुंबात २ मुली असतील व दोन्ही मुलींना जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सुकन्या योजनेच्या २ खाती उघडून याचा लाभ घेता येईल.
  • सुकन्या समृद्धी योजना खात्यात रोख रक्कम, डिमांड ड्राफ्ट, चेक किंवा कोअर बँकिंग सिस्टम च्या साह्याने पैसे भरता येतात.
  • मुलीचे वय २१ वर्षे पूर्ण झाल्यावर जमा रक्कम व्याजासकट पालकांच्या खात्यामध्ये जमा केली जाते व सदर खाते बंद केले जाते.
  • मुलीचे नाव न ठेवले गेले असल्यास आईच्या नावावर सुकन्या समृद्धी योजना खाते उघडता येते ते पुढे जाऊन बदलून मुलीच्या नावावर करता येते.

नक्की वाचा – असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी सरकारची नवी ई-श्रम योजना ! 

आवश्यक कागदपत्रे –

  • मुलीच्या जन्माचा दाखला
  • पॅन कार्ड
  • आधार कार्ड
  • मतदान ओळखपत्र
  • रेशन कार्ड
  • विज बिल
  • मुलीच्या आई-वडिलांचा फोटो व रहिवासी प्रमाणपत्त्र

मुलीच्या आईवडिलांचे कागदपत्रे असणे अनिवार्य आहे. जर मुलीचे आई-वडील नसतील तर अशा परिस्थितीत मुलीची देखभाल करणाऱ्या व्यक्तीचे कागदपत्रे आवश्यक आहेत. 

हेही वाचा – Masked Aadhar Card – मास्क आधार म्हणजे काय रे भाऊ?

सुकन्या समृद्धी योजना काय आहे ?

  • खाते उघडल्यापासून मुलीचे वय २१ वर्ष होईपर्यंत  या योजनेचा लाभ घेता येतो. तसेच, सुरुवातीचे फक्त १५ वर्षांपर्यंतच लाभधारकांना या योजनेअंतर्गत पैसे जमा करता येऊ शकतात.
  • मुलीचे वय २१ वर्षे पूर्ण होण्याअगोदरच जर मुलीचे लग्न झाले तर त्या मुलीला सुकन्या समृद्धी योजनेतुन रद्द केले जाते व व सदर खाते बंद केले जाते.
  • सुकन्या समृद्धी योजना १०० टक्के सुरक्षित योजना मानली जाते. व या योजनेअंतर्गत जमा रकमेवर टॅक्स भरावा लागत नाही.
  • मुलीचे वय १८वर्ष पूर्ण झाल्यावर मुलीच्या उच्च शिक्षणासाठी तसेच तिच्या आरोग्यासाठी सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्यातून फक्त ५० टक्के रक्कम काढता येते.
  • या योजनेत दरवर्षी किमान रु. २५० भरणे अनिवार्य आहे व तसे न केल्यास सदर खाते बंद केले जाते व खाते पुन्हा सुरू करण्यासाठी जितकी वर्षे खाते बंद असेल त्या प्रत्येक वर्षाला रु.५० दंड आकारून खाते पुन्हा सुरू केले जाते. 

योजनेचा लाभ घेण्यासाठी खाते कसे उघडाल – 

  • सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज डाउनलोड  करा किंवा जवळच्या राष्ट्रीयकृत बँकेत जाऊन सुकन्या समृद्धी योजनेचा अर्ज करा. 
  • सदर अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून त्या अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स प्रत जोडा आणि सदर अर्ज बँकेत जमा करा.
  • सुकन्या योजनेचे खाते उघडण्यासाठी किमान रु.२५० जमा करावे लागतात.
  • पैसे जमा केल्यावर लाभार्थ्यांना बँकेकडून एक पासबुक दिले जाते ज्यामध्ये खातेदाराला १५ वर्षापर्यंत पैसे जमा करावे लागतात.
  • अशा प्रकारे तुम्ही बँकेच्या माध्यमातून सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेऊ शकता.

योजनेचा उद्देश –

  • मुलीचे शिक्षण,आरोग्य, मुलीचे लग्न तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्य सुधारणे.
  • मुलींना भविष्यात सन्मानाने जगता यावे, मुलींना भविष्यात आत्मनिर्भर बनवण्यासाठी तसेच, तिचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी ही योजना सुरु केली आहे.
  • राज्यातील मुलींचा सामाजिक व आर्थिक विकास करणे.
  • भविष्यात मुलींना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे. 

योजनेत काय बदल झाले आहेत ? 

  • नवीन नियमांनुसार, सुकन्या योजनेच्या खात्यामध्ये चुकीचे व्याज जमा झाल्यानंतर ते परत करण्याची तरतूद काढून टाकण्यात आली आहे. 
  • प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी खात्यात वार्षिक व्याज जमा केले जाईल.
  • मुलगी १८ वर्षांची होईपर्यंत तिला खाते चालवण्याची परवानगी मिळणार नाही. तोपर्यंत केवळ पालकच हे खाते चालवू शकतात.
  • एका मुलीनंतर दोन जुळ्या मुली जन्माला आल्यास त्या दोघींचे खाते उघडण्याची तरतूद करण्यात आली आहे.
  • या योजनेअंतर्गत खात्यात वर्षाला किमान रु.२५० जमा करणे आवश्यक आहे. ही रक्कम जमा न केल्यास खाते डिफॉल्ट मानले जात होते. परंतु नवीन नियमांनुसार खाते पुन्हा सक्रिय न केल्यास मॅच्युरिटीपर्यंत खात्यात जमा केलेल्या रकमेवर लागू दराने व्याज जमा होत राहील. 
  • पूर्वीच्या नियमानुसार मुलगी मरण पावली किंवा मुलीचा पत्ता बदलला अशा दोन परिस्थितींमध्ये सुकन्या समृद्धी खाते बंद केले जाऊ शकत होते. मात्र आता पालकाचा मृत्यू झाल्यास खाते मुदतीपूर्वी बंद केले जाऊ शकते.

सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणुकीला सुरुवात करा आणि मुलींचे आर्थिक भविष्य सुरक्षित करा !

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…