आधार क्रमांकाच्या सहाय्याने आता मिळवा पॅनकार्ड !

Reading Time: 2 minutes जुलै २०१९ ला जाहीर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये अनेक नवीन नियम प्रस्तावित करण्यात आले होते. करवसुली,  करबुडाव्यांना चाप, पारदर्शी व्यवहार ही प्रमुख उद्दिष्ट्ये डोळ्यासमोर ठेवून नियमांची आखणी करण्यात आली होती. आयकर विवरण पत्र म्हणजे आयटीआर (ITR) संदर्भात अनेक नवीन नियमांची भर पडली आहे. तसेच, पॅन आधार जोडणीही बंधनकारक करण्यात आली आहे.नवीन नियमांमुळे नागरिकांनी गोंधळून जायचे काहीच कारण नाही. कारण कोणत्याही परिस्थितीत नागरिकांची गैरसोय होऊ नये याचीही काळजी घेण्यात आली आहे. 

पगारदारांनो आयकर विवरणपत्र भरताना ही काळजी घ्या

Reading Time: 3 minutes आपल्या मालकाकडून आपणास फॉर्म नंबर १६ मिळाला असेल. यात आपणास मालकाकडून मिळालेले उत्पन्न यातून आपण जाहीर केलेल्या आणि कायद्यानुसार मिळत असलेल्या विविध वजावटींचा विचार करून आपले करपात्र उत्पन्न व कापलेला कर याची तपशीलवार माहिती असते. आयकर कायद्यानुसार सर्व मार्गाने मिळणारे उत्पन्न मग ते करपात्र असो अथवा नसो याची गणना आपल्या निव्वळ उत्पन्नात (gross income) होते. त्यामुळेच आपल्याला मिळत असलेल्या उत्पन्नापैकी काही गोष्टीकडे दुर्लक्ष झाल्याने त्या जमेस घ्यायच्या राहून जातात. त्या कोणत्या याच्यावर एक दृष्टिक्षेप

आयकर रिटर्न भरताना झालेल्या चुका कशा दुरुस्त कराल?

Reading Time: 3 minutes आयकर रिटर्न भरल्यानंतर त्याची आयकर विभागाकडून कम्प्युटर प्रोग्रॅमद्वारा तपासणी केली जाते व त्यासंबंधित सूचना करदात्याला पाठवली जाते. सूचनांमध्ये आपल्याकडून सादर केलेल्या परताव्याचे तपशील आणि आयकर विभागाकडे उपलब्ध असलेले तपशील यांच्यामध्ये काही फरक आढळला असल्यास त्यासंबंधीची नोंद असते. जर करदात्यास यासंदर्भात कोणत्याही शंका असतील अथवा या सूचना मान्य असतील तर संबंधित सूचनांनुसार दुरुस्ती करून पुन्हा रिटर्न भरावा लागतो तसेच आकारण्यात आलेल्या कराची जादा रक्कम भरावी लागते.