तुमची आर्थिक उद्दिष्टे कशी ठरवाल?

Reading Time: 4 minutes आपल्या भविष्यासाठी, आपली आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी आर्थिक नियोजन करणं आवश्यक आहे, याबद्दल कोणाचंच दुमत नसेल.  पण आर्थिक नियोजन कसं करायचं? ते करण्याची सुयोग्य पद्धत कोणती? असे अनेक प्रश्न बहुतांश लोकांच्या मनात असतील. या लेखात आपण शास्त्रीय पद्धतीने करण्यात येणाऱ्या आर्थिक नियोजनाची माहिती घेऊ. आर्थिक नियोजनाची सर्वात महत्वाची पायरी म्हणजे ध्येयनिश्चिती किंवा आर्थिक उद्दिष्ट्ये निश्चित करणे. ध्येयनिश्चिती करण्याच्या पाच महत्वाच्या पायऱ्या या लेखात आपण जाणून घेणार आहोत. प्रत्येक पायरीवर जरा थांबून विचार करून, मगच पुढच्या पायरीवर जायचे आहे.