Budget 2021: अर्थसंकल्पात इंटरनेटसंबंधी क्रांतिकारी धोरण? 

Reading Time: 4 minutes इंटरनेटने आधीच जगाला अधिक गती दिली होती, आता कोरोना संकटाने त्याच्या वापराची अपरिहार्यता लक्षात आणून दिली आहे. पण त्यातून ते वापरणारे आणि ते न वापरणारे, असा विषमतेला खतपाणी घालणारा भेद निर्माण झाला आहे. इंटरनेट सर्वांपर्यंत पोचणे आणि सर्वांना ते परवडणे, हे आव्हान त्यातून उभे राहिले असून उद्याच्या अर्थसंकल्पात त्यासंदर्भातील सर्वसमावेशक आणि तेवढेच क्रांतिकारी धोरण जाहीर केले जाण्याची अपेक्षा आहे.