नोटबंदीचे महत्व अधोरेखित करणारे करसंकलनाचे आकडे
Reading Time: 4 minutesदेशातील चलन बँकेतून फिरले तर अर्थव्यवस्था विश्वासार्ह होते आणि त्यातून पुरेसा कर जमा होऊन पब्लिक फायनान्समध्ये सुधारणा होते. देश चांगला चालण्यासाठीची ही पूर्वअट आहे. नोटबंदीसारख्या आर्थिक सुधारणांचा हा दिशाबदल योग्य मार्गाने चालला आहे, असे अलीकडे जाहीर झालेली आकडेवारी सांगते.