आयकर रिटर्न भरताना झालेल्या चुका कशा दुरुस्त कराल?
Reading Time: 3 minutesआयकर रिटर्न भरल्यानंतर त्याची आयकर विभागाकडून कम्प्युटर प्रोग्रॅमद्वारा तपासणी केली जाते व त्यासंबंधित सूचना करदात्याला पाठवली जाते. सूचनांमध्ये आपल्याकडून सादर केलेल्या परताव्याचे तपशील आणि आयकर विभागाकडे उपलब्ध असलेले तपशील यांच्यामध्ये काही फरक आढळला असल्यास त्यासंबंधीची नोंद असते. जर करदात्यास यासंदर्भात कोणत्याही शंका असतील अथवा या सूचना मान्य असतील तर संबंधित सूचनांनुसार दुरुस्ती करून पुन्हा रिटर्न भरावा लागतो तसेच आकारण्यात आलेल्या कराची जादा रक्कम भरावी लागते.