P/E Ratio: ‘किंमत-उत्पन्न गुणोत्तर’- शेअर मार्केटमधील गुंतवणूकदारांचा अदृश्य सल्लागार !

Reading Time: 4 minutesमग शेअर बाजारात गुंतवणूक करताना केवळ चढता-उतरता ग्राफ पाहून, हिरवे किंवा लाल आकडे पाहून अथवा कुणाच्या ‘टीप’च्या आधारे गुंतवणूक करायची ठरवणे म्हणजे वेडेपणाच म्हणायला हवा की नाही? अर्थात शेअर मार्केटमध्ये आपणास प्रत्यक्षरित्या कंपनीचे कामकाज पाहता येत नाही किंवा एवढ्या मोठ्या उद्योगाची आवक जावक पडताळून पहात बसणे शक्य नसते. अशावेळी आपल्या मदतीला धावून येतो तो ‘पी/ई रेशो’.