शेअर बाजार : किंमत-उत्पन्न प्रमाण (P/E Ratio) म्हणजे काय?

Reading Time: 3 minutes कोणत्याही प्रकारचा गुंतवणूकदार असो, कोणत्याही कंपनीच्या समभागामध्ये आपला पैसा गुंतवण्याआधी त्या कंपनीचा- त्याच्या मूल्याचा अभ्यास करणे गरजेचं असतं. याच अभ्यासाचा एक महत्वाचा निकष म्हणजे प्राईज-अर्निंग रेश्यो, ज्याला थोडक्यात “किंमत-उत्पन्न प्रमाण” म्हणतात. बेंजामिन ग्रॅहम यांच्या मते, हा किंमत-उत्पन्न प्रमाण म्हणजे एखादा समभाग निव्वळ गुंतवणूकीवर आधारित आहे की सट्टेबाजीच्या आधारावर व्यापार करीत आहे, हे निर्धारित करण्याचा अतिशय वेगवान आणि सोपा मार्ग आहे.