Gold ETF Vs Gold Mutual Fund: गोल्ड ईटीएफ की गोल्ड म्युच्युअल फंड, तुम्ही काय निवडाल?
Reading Time: 3 minutesसोन्याच्या दरामध्ये कधीही अचानक मोठा बदल होत नाही. या अमूल्य अशा धातूमध्ये गुंतवणूक करण्याचे अनेक पर्याय सध्याच्या काळामध्ये आपल्याकडे उपलब्ध आहेत. आपण दुकानांमध्ये जाऊन ‘फिजिकल गोल्ड’ विकत घेऊ शकतो, म्युच्युअल फंड आणि ईटीएफच्या माध्यमातून देखील आपण सोन्यामध्ये गुंतवणूक करू शकतो. या सर्व गुंतवणुकीच्या पर्यायाबद्दल आपण या लेखामध्ये मध्ये माहिती जाणून घेणार आहोत.