Guarantor -कर्जासाठी जामीन राहताय? थांबा आधी हे वाचा…

Reading Time: 3 minutes अनेकदा आर्थिक अडचणींच्या वेळी किंवा घर खरेदी, उच्चशिक्षण, शुभकार्य यासारख्या अनेक गोष्टींसाठी कर्ज घयायची वेळ येते. काही वेळा बँकेच्या नियमानुसार कर्जदार त्याला हव्या असणाऱ्या रकमेच्या कर्जासाठी अपात्र ठरत असल्यास अथवा काही वेळा बँकेच्या नियमांनुसार कर्जदाराला कर्ज घेताना जामीनदारांची आवश्यकता भासते.  उदा. कर्जदाराची शैक्षणिक पार्श्वभूमी, सतत बदलल्या जाणाऱ्या नोकऱ्या किंवा सततची बदलीची नोकरी, कमी मासिक उत्पन्न, तारण ठेवण्यात आलेल्या मालमत्तेचे मूल्य कमी असणे यासारख्या अनेक कारणांमुळे कर्ज घेताना जमीनदाराची गरज भासते.