तिशीनंतरचे आर्थिक नियोजन कसे कराल? – भाग १

Reading Time: 3 minutesतिशीनंतरचे आर्थिक नियोजन हे शीर्षक वाचून अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील. वयाच्या तिशीमध्ये प्रवेश करताना  नोकरी धंद्याला सुरुवात होऊनही एक ठराविक काळ उलटून गेलेला असतो. काही प्रमाणामध्ये आर्थिक आर्थिक आघाडीवर स्थिरता यायला लागलेली असते. आयुष्यामध्ये एका महत्त्वाच्या टप्प्यावर आपण उभे असतो अशा वेळेला इथून पुढच्या आयुष्याची मजबूत आर्थिक पायाभरणी करण्याची हीच योग्य वेळ असते.