गुंतवणुकीच्या खेळातले सात नियम
Reading Time: 3 minutesसध्या शेअर बाजारातील हवा नरमगरम आहे, आर्थिक मंदीची चर्चा सुरू आहे आणि इक्विटी म्युच्युअल फंडांतील गुंतवणूकदार कपाळाला हात लावून बसले आहेत. “दोन-तीन वर्षे चालू ठेवलेल्या सिपमध्ये (SIP) नुकसान कसे काय दिसतेय?” असा जाबदेखील अनेक जण विचारत आहेत. काहींना आपले नशीब खराब वाटतेय, तर काहींना आपण फसवले तर गेलो नाही ना, याची शंका येतेय. म्युच्युअल फंडांतील गुंतवणूकदारांचा हा सगळा सार्वजनिक गोंधळ उडालेला आहे तो या खेळाचे नियम त्यांनी समजून घेतले नाहीत म्हणून.