Lifestyle: तुम्ही महागड्या जीवनशैलीच्या जाळ्यात अडकलात तर नाही ना?
Reading Time: 4 minutes सध्याचे जग हे झगमगीत, चंदेरी दुनियेने भारलेले, जाहिरातबाजीने व्यापून गेलेले आहे. जगातील सर्व कंपन्या भारताकडे एक मोठी बाजारपेठ म्हणून बघतात आणि या विश्वातील आपली ओळख ही केवळ एक खरेदीदार अशी उरली आहे. त्यामुळेच विविध क्लृप्ती वापरून, जाहिरातींचा मारा करून, किंवा आभासी कल्पना मनात भरवून विविध गोष्टी, किंवा सेवा खरेदी करण्यासाठी आपल्याला उद्युक्त केलं जातं. त्याचा नकळत होणार परिणाम म्हणजे हळूहळू महागडी होत जाणारी आपली जीवनशैली.