Bank Charges: बँकेच्या या चार्जेस बद्दल तुम्हाला माहिती आहे का?

Reading Time: 4 minutes आपल्यापैकी प्रत्येकाचं बँकेत बचत खातं नक्कीच असेल, परंतु तुम्हाला याची कल्पना आहे का बचत खात्यासाठी मिळणाऱ्या विविध सेवा बँक मोफत देत नाही. त्यासाठी बँक तुम्हाला काही शुल्क आकारते (Bank Charges). आज आपण बँकेच्या विविध चार्जेसबद्दल जाणून घेऊया.  बचत खात्याच्या विविध सेवांसाठी जी रक्कम आपल्या खात्यातून कापून घेतली जाते त्याबद्दल बरेचदा आपल्याला कल्पना नसते.