आयपीओ अलर्ट – “उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक”

Reading Time: 5 minutes उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक (USFB) या कंपनीची प्राथमिक भागविक्री (IPO = Initial Public Offering)  दि. २,३ व ४ डिसेंबर या ३ दिवशी खुली असणार आहे. आयपीओ द्वारे उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेची शेअर बाजारात नोंदणी होणार आहे. कंपनीचे जवळपास रु. १००० कोटी भांडवल म्हणून जमा करण्याचे लक्ष ठेवले होते. यापैकी २ आठवड्यांपूर्वी प्री- आयपीओ भाग विक्रीद्वारे रु. २५० कोटी जमा केले आहेत. आयपीओद्वारे रु.७५० कोटी उभे केले जाणार आहेत. त्याचा वापर कंपनीच्या व्यवसायवृद्धीसाठी होणार आहे.