नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड – बहुउद्देशीय प्रवासी कार्ड

Reading Time: 2 minutes ‘एक देश एक कार्ड’ या उद्देशाने ‘मेक इन इंडिया’ या महत्वाकांक्षी कार्यक्रमाचा भाग म्हणून बरेच वर्ष संकल्पित असलेले नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC)  हे बहुउद्देशीय प्रवासी कार्ड ४ मार्च २०१९ पासून अस्तित्वात आले आहे. सध्या वेगवेगळ्या सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर करताना त्याचा मोबदला सामान्यतः रोख रकमेने करण्यात येतो. याचे व्यवस्थापन करणे त्रासदायक व खर्चिक आहे. रोकडविराहित व्यवहार आपणास वेगवेगळ्या कार्डसच्या माध्यमातून करावा लागत आहे. यावर मात करण्यासाठी प्रत्येक यंत्रणेने स्वतःची वेगळी कार्ड पेमेंट व्यवस्था चालू केली.