पर्यायी गुंतवणूक निधी (AIF) म्हणजे काय?

Reading Time: 3 minutes बांधकाम क्षेत्रात असलेली मरगळ दूर व्हावी, अर्धवट रखडलेले प्रकल्प पूर्ण व्हावेत या हेतूने १० हजार कोटी रुपयांचा निधी अलीकडेच केंद्र सरकारने उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये भारतीय स्टेट बँक आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ १५ हजार कोटी रुपयांची भर घालेल. त्यामुळे या क्षेत्रासाठी २५ हजार कोटी रुपयांचे अतिरिक्त  भांडवल उपलब्ध होईल.