Aptus Value Housing Finance: Aptus व्हॅल्यू हाऊसिंग कपंनीच्या आयपीओ संदर्भात ९ महत्वाच्या गोष्टी : 

Reading Time: 3 minutes गृहकर्ज देणाऱ्या क्षेत्रातील मोठं नाव  ‘Aptus व्हॅल्यू हाऊसिंग (Aptus Value Housing Finance)’ कंपनी आपला आयपीओ घेऊन आली आहे. घराचं बांधकाम, नवीन घर खरेदी, घर सुधारणा या सर्व गरजांसाठी लोकांना तत्परतेने मदत करणाऱ्या या कंपनीच्या आयपीओला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतांना दिसत आहे. ‘Aptus व्हॅल्यू हाऊसिंग’ या कंपनीने काही वर्षांपूर्वी मालमत्ता विमा सुद्धा सुरू केल्याने त्यांच्या ग्राहक संख्येत लक्षणीय वाढ झाली आणि ही कंपनी खऱ्या अर्थाने लोकांना माहीत झाली.