ज्येष्ठ नागरिकांच्या कायदेशीर समस्या आणि त्यावरील उपाय

Reading Time: 4 minutes अनेकदा पालकांना स्वत:च्या मुलांवर पोलीस केस करण्याची सुद्धा वेळ येते. म्हातारपणी जवळ साठवलेली पुंजी पोटच्या पोरांनी हडप करून राहायला जागा सुद्धा न देणे हे पाहणे आणि सोसणे तितकेच वेदनादायक ठरते शिवाय मुलांविरुद्ध लढण्याचा स्टॅमिना आणि इच्छा दोन्हीही उरलेली नसते. अनेक असे दुर्दैवी पालक आपण हलाखीच्या परिस्थितीमध्ये जगताना पाहतो. भारतीय राज्यघटनेची जी मार्गदर्शक तत्वे आहेत, त्या तत्वांतर्गत राज्याने वायोवृद्ध नागरिकांची काळजी घेतली पाहिजे त्यांच्या हक्काचे संरक्षण केले पाहिजे, त्यांचे सामाजिक अधिकार कसे सुरक्षित राखता येतील, यासाठी राज्याने प्रयत्न केले पाहिजेत, असे सांगितले आहे. यासंदर्भात काही कायदे देखील केंद्र सरकारने पारित केलेले आहेत. आता ते कायदे पाहण्याच्या पूर्वी आपण काही मुलभूत गोष्टी पाहू.