महिला दिन विशेष: महिलांसाठी आर्थिक नियोजनच्या ५ सोप्या स्टेप्स
Reading Time: 4 minutesआज जागतिक महिला दिनाच्या दिवशी वर्तमानपत्राची पानं बातम्यांपेक्षा जास्त जाहिरातींनीच भरलेली दिसतात. त्यात बहुतांश जाहिराती महिला दिनानिमित्त असणाऱ्या कपडे, ब्युटी प्रॉडक्ट आणि दागिन्यांच्या ऑफर्ससंदर्भात असतात. महिला म्हणजे शॉपिंग’ हे जणू एक समीकरणच पक्के झालं आहे. पण प्रत्यक्षात मात्र तसं नाहीये. स्त्रिया म्हणजे शॉपिंग नाही तर त्या उत्तम आर्थिक नियोजन करू शकतात. आजच्या लेखात आपण पाहणार आहोत महिलांसाठी आर्थिक नियोजनाच्या ५ सोप्या स्टेप्स.