मित्राला व्यवसायामध्ये आर्थिक मदत करताना लक्षात ठेवा या ६ गोष्टी

Reading Time: 3 minutes आपल्या मित्राला चालू व्यवसाय वाढविण्यासाठी, विस्तारण्यासाठी, अन्य ठिकाणी कार्यालय स्थापण्यासाठी भांडवलाची गरज लागते. त्यावेळी एक मित्र म्हणून त्याला मदत करणे हे आपले कर्तव्य असते. पण असे व्यवहार मैत्रीत करताना भावना व कर्तव्य याचा गोंधळ/ घोळ हमखास होतो. त्यासाठी काही पथ्ये पाळली, तर निष्कारण नंतर होणार मनस्ताप टाळू शकतो. शिवाय मित्राला मदत होऊन त्याचा  व्यवसाय व्हायलाही मदत होईल व आपली मैत्रीही अबाधित राहील. अर्थात ही भांडवल उभारणीची मदत डोळे झाकून न करता जर डोळस पणे केली, तर सोन्याहून पिवळे नाहीतर पितळ किंवा कथिलाचा वाळा!