General Insurance -सर्वसाधारण विमा योजनेचे विविध प्रकार

Reading Time: 3 minutes विविध प्रकारच्या धोक्यातून होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण मिळवण्यासाठी विमा काढला जातो,  हे आपल्याला माहीत आहेच. विम्याद्वारे ही भरपाई पैशांच्या स्वरूपात केली जाते. आयुष्याची अशाश्वतता ही जीवनविमा (Life insurance) घेऊन सुरक्षित केली जाते तर इतर सर्व गोष्टीतील धोका हा सर्वसाधारण विमा योजना (General Insurance) घेऊन सुरक्षित केला जातो. असे अनेक प्रकारचे धोके निश्चित करून त्यावर मात करण्यासाठी सर्वसाधारण विमा घेतला जातो. हा ग्राहक आणि विमाकंपनी यातील कायदेशीर करार असून उभयपक्षी यातील अटींचे पालन करावे लागते. या योजनांची मुदत सर्वसाधारण पणे एक वर्ष असून क्वचित २/३  वर्षाचीही असू शकते. यातील काही योजना या कायद्याने आवश्यक असून अनेक योजना ऐच्छिक आहेत.