Ghadi Detergent: घडी डिटर्जंट कंपनीचा थक्क करणारा प्रवास

Reading Time: 4 minutes “पहले इस्तमाल करे, फिर विश्वास करे” प्रत्येक वस्तू आणि सेवांना लागू पडणारी ही ‘घडी’ डिटर्जंटची  (Ghadi Detergent) टॅगलाईन सर्वांच्या परिचित आहे. कानपूरच्या मुरलीधर ग्यानचंदानी आणि बिमलकुमार ग्यानचंदानी यांनी १९८७ मध्ये प्रस्थापित निरमा, सर्फ, व्हील यांच्यासमोर ‘घडी’ हे आणखी एक कपडे धुण्याची पावडर व साबण हे उत्पादन बाजारात आणलं. ग्यानचंदानी कुटुंबाला कित्येक व्यवसायिकांनी संभाव्य धोक्याची जाणीव करून दिली होती. पण, ग्यानचंदानी बंधूंनी ‘कपडे धुण्यासाठी वापरता येईल अशा पावडरचा मागणी विरुद्ध पुरवठा हा पूर्ण अभ्यास करूनच ‘घडी’ सुरू करण्याचा निर्णय घेतला.