गुगल माय बिझनेस म्हणजे नेमकं काय?

Reading Time: 3 minutes “गुगल” हे एक सर्च इंजिन आहे, म्हणजे इंटरनेटवरील एक संकेतस्थळ ज्यावर कुठल्याही विषयाची माहिती असो किंवा तुमच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर एका क्लिकवर मिळते. खाण्यासाठी उत्तम हॉटेल शोधण्यापासून ते चांगला लाँड्रीवाला भैया शोधण्यासाठी हे गुगल कायम आपल्या मदतीसाठी सज्ज असतं. या हॉटेल्स किंवा या सोयी सुविधांची माहिती गुगलवर येते कुठुन? तर याचं उत्तर म्हणजे व्यावसायिक त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी, जास्तीचे गिऱ्हाईक खेचण्यासाठी, जाहिरातीसाठी “गुगल माय बिझनेस” या गुगलमार्फतच चालू झालेल्या टूलचा वापर करतात. थोडक्यात सर्व व्यावसायिकांसाठी हक्काचं व्यासपीठ म्हणजे “गुगल माय बिझनेस”.

गूगल पैसा कसं कमावतं? भाग २

Reading Time: 3 minutes गूगल गाय दूध तर खूप देते आणि स्वतःही हवा तेवढा चारा मिळवते. मोठा चारा घोटाळा गूगल गायीचा अजून तरी झालेला ऐकिवात नाही. गूगलने गेल्या काही वर्षांत पाचशे कंपनीज विकत घेतल्या त्याही हजारो लाखो डॉलर्स मध्ये. म्हणजे गूगल किती जबरदस्त महसूल कमावत असेल हे लक्षात येतं. पण कसं कमावतं हे ही मनोरंजक आणि महत्वाचं आहे.

गूगल पैसा कसं कमावतं? भाग १

Reading Time: 2 minutes गूगल आपल्याला ‘फ्री’ मध्ये इतकं सारं कसं काय देतं? किंवा का देतं? असे प्रश्न साहजिकच अनेकांना पडतात. अर्थात ते पडायलाच हवेत.आज ‘माय’ सोडल्यास कोणीही फ्रीमध्ये काहीही देत नाही. मग ही गूगलगाय मोफत गूगल दुग्ध कशी देत असावी? मग गूगल पैसा कसं कमावतं? हे प्रश्न अनेकांच्या मनात असतात. गूगल ही पाश्चिमात्य कंपनी. त्यामुळे “फ्री मील्स” देण्याचा संबंधच नाही. गूगल हवं तेव्हा हवं तितकं त्याच्या ‘सर्च इंजिन’द्वारे कुठे कुठे फिरवून आणतं, हवी ती माहिती देतं. गूगलच्या ‘जीमेल (Gmail) वरून वैयक्तिक तसेच व्यावहारिक मेल संवाद सुरूअसतात. मग ही सर्व ‘सेवा’ गूगल कशी ‘फ्री’ मध्ये त्याच्या ‘ग्राहकांना’ कशी देत असेल? आणि का देत असेल?