Success Story of ITC-‘आयटीसी’ची यशोगाथा

Reading Time: 4 minutesभारतातील शेअर बाजारावर नोंद असलेल्या यशस्वी कंपन्यांमधली दादा कंपनी म्हणून “आयटीसी लिमिटेड” ओळखली जाते. हिंदीमध्ये आजोबांना “दादाजी” नावाने हाक मारतात. आयटीसी लिमिटेड मात्र भल्याभल्या कॉर्पोरेटर्ससाठी कर्तुत्वाबरोबरच वयाने सुद्धा दादाजी आहे. आयटीसीचा जन्म १९१० साली “इम्पेरियल टोबाको कंपनी” म्हणून कोलकाता येथे झाला. तेव्हा प्रमुख व्यवसाय तंबाखू आणि सिगारेट होता.