पॉन्झी स्कीमच्या सापळ्यात फसलेल्या शांताबाईंची व्यथा
Reading Time: 2 minutesआजची कथा आहे, शांताबाई या एका डॉक्टरांच्या दवाखान्यात काम करणाऱ्या मावशींची…
गेल्या २ वर्षांपासून त्या डॉ. दाते यांच्या दवाखान्यात काम करत आहेत. मनापासून काम करणे, वेळ पाळणे, पेशन्टला औषधे नीट सांगणे यामुळे दाते डॉक्टर अगदी निश्चिन्त असत. त्यांच्या नवऱ्याचं अकाली निधन आणि एक मुलगा आणि मुलीची असलेली जबाबदारी त्यांनी अगदी लीलया पेलली. डॉक्टरांकडचा पगार, नवऱ्याची मिळणारी काही पेन्शन यावर त्या हे सगळं चालवत होत्या. मात्र काही दिवसांपासून असलेला त्यांचा उदास चेहरा काही दातेंच्या नजरेतून सुटला नाही आणि त्यांनी शांताबाईंना त्याबाबत विचारलं. आधी फारसं काही न सांगणाऱ्या शांताबाईंचा धीर सुटला आणि त्यांची कहाणी ऐकून डॉ. दाते तर चक्रावूनच गेले